मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आदेशाचं पालन केल्यानं भाजपला का पोटदुखी?

देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवे - नाना पटोले
Nana Patole
Nana Patolesakal media
Summary

देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवे - नाना पटोले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मागली काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपाच्या नेत्यांनी पटोले यांच्यावर टीकाही केली. दरम्यान, आता पटोले यांनी पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सराकारचा आमच्यावर दबाव असल्याचे सांगत असेल तर संवैधानिक व्यवस्था आज धोक्यात आली आहे हे स्पष्ट आहे, असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले मागील सात वर्षात देशाचे चित्र बदलले आहे. देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवे असे सूचक वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकावर टिकास्त्र सोडले आहे. आज मुख्यमंत्री बाहेर पडले याबाबत ते म्हणाल, कोरोना काळात देशाच्या पंतप्रधानांनी काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं. आपण शाळा, बाजार, सगळे बंद केले होते. देशाच्या पंतप्रधानांच्या आदेशाचे मुख्यमंत्र्यांनी पालन केले तर भाजपला का त्रास होत आहे, त्यांच्या पोटात का दुखत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Nana Patole
ते पैसे आता येणार नाहीत... अर्थसंकल्पाआधीच अजित पवारांचा खुलासा

मालेगावमधील काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेशावर ते म्हणाले, या असे बदल राजकारणात चालत राहणार आहेत. कारण प्रत्येकाला पक्ष वाढवायचा आहे, आणि पक्ष वाढीचे स्वातंत्र्यही आहे. कोण इकडे येणार, कोण तिकडे जाणार, यात टेन्शन घेण्यासारखे काहीच नाही. जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारण्यासाठी धर्मांधतेचे वातावरण तयार केले जात आहे. मुंबईतील त्या गार्डनला नाव देण्याचं काम महापालिकेचे आहे. अस्लम शेख गार्डनचे नामकरण करायला गेले नाहीत. त्यांनीच मंजूर करुन घेतलेल्या निधीतून या गार्डनचे सुशोभिकरण झाले आहे, त्याचे ते उद्घाटन करणार आहेत. तिथे टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

भाजपाच्या अमित देशमुख आणि नितीन राऊत यांच्या विधानावर ते म्हणाले, फडणवीस यांच्या काळात काय झालं? त्यावेळी फक्त धिंगाणा सुरू होता. आमच्या मंत्र्यांनी जी भूमिका मांडली ती गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सावधान करणं यात काय गैर आहे असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Nana Patole
Bigg Boss 15: आंटी म्हटलीच कशी? बिग बॉसच्या घरात धिंगाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com