कर्नाटक, मध्यप्रदेशनंतर ब्लॅकमेलिंग करून महाराष्ट्र सरकार पाडण्याचा भाजपचा डाव

कर्नाटक आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यात त्यांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला, ब्लॅकमेलिंग करून सत्ता मिळविली. आता तोच प्रकार महाराष्ट्रात केला जात आहे. भाजपच्या विरोधातील नेत्यांची ईडी, सीबीआय चौकशी लावली जाते. मग, आता देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात जबाब देण्यासंदर्भात नोटीस आल्यानंतर एवढी भीती, कांगावा करून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज काय, असा प्रश्‍न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.
maharashtra government
maharashtra governmentsakal News

सोलापूर : कर्नाटक आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यात त्यांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला, ब्लॅकमेलिंग करून सत्ता मिळविली. आता तोच प्रकार महाराष्ट्रात केला जात आहे. भाजपच्या विरोधातील नेत्यांची ईडी, सीबीआय चौकशी लावली जाते. मग, आता देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात जबाब देण्यासंदर्भात नोटीस आल्यानंतर एवढी भीती, कांगावा करून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज काय, असा प्रश्‍न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला. ब्लॅकमेलिंग करून राज्य सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे. पण, हे राज्य सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, रश्‍मी शुक्‍ला यांना फोन टॅपिंग करण्यासाठी कोणी परवानगी दिली, त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते, याची चौकशी व्हायला हवी, असेही नाना पटोले म्हणाले.

maharashtra government
झेडपीवर 21 मार्चपासून प्रशासक! पंचायत समित्यांची मुदत 13 मार्चपर्यंतच

शेतकरी आत्महत्या या भूषणावह नाहीत. शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे असून शेतकऱ्यांना 24 तास मिळायला हवी. तसेच देशाच्या अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचे दर अधिक आहेत. त्यावरही काम करण्याची गरज असून आम्ही अधिवेशनात त्यासंदर्भात आमची भूमिका मांडू, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचा दर अधिक आहे. तसेच शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळत नाही. त्यामुळे त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. 2017 नंतर कृषीपंपाच्या वीज बिलाची वसुलीच झाली नाही. त्यावेळी वीजेची थकबाकी माफ केल्याची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. त्यामुळे थकबाकी वाढली आणि आता कोळसा घ्यायलासुध्दा पैसा नाही. दुसरीकडे कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीतील उत्पन्न घटले आणि राज्य सरकारला मदत करता आली नाही. आता आर्थिक स्थिती सुधारत असून निश्‍चितपणे वीज तोडणीचा प्रश्‍न लवकरच मिटेल, असा विश्‍वासही श्री. पटोले यांनी यावेळी व्यक्‍त केला.

maharashtra government
उन्हाळा सुट्टीतही भरणार शाळा! निर्णय शिक्षकांसाठी ऐच्छिक

मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे घेतील. दरम्यान, मंत्रिमंडळातील फेरबदलाचा हा काळ नसून पक्ष संघटना मजबूत करण्याची ही वेळ असल्याचेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

maharashtra government
राष्ट्रवादीसह विरोधकांचा चक्रव्यूह! कॉंग्रेसमधील पक्षांतरामुळे आमदार प्रणिती शिंदे एकाकी

महाराष्ट्राचे दिल्लीतील नेते करताहेत गुजरातचे नेतृत्व
रेल्वे, रस्त्यांचा विस्तार होत असतानाच राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प होण्यासाठी, विकासकामांसाठी अधिकाधिक निधी खेचून आणण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेले नेते करीत असतात. पण, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणत असतील की राज्याने 50 टक्‍के निधी द्यावा. तर त्यांनी गुजरातचे नेतृत्व कधीपासून स्वीकारले, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com