Satyajeet Tambe: मामा-भाच्यानं करुन दाखवलं? सत्यजित तांबेंच्या प्रचारातील 'ती' कार चर्चेत

बाळासाहेब थोरात प्रत्यक्ष या निवडणुकीत सहभागी नसले तरी त्यांचा प्रभाव दिसून येत आहे.
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांचा विजय निश्चित मानला जात आहे, कारण चौथ्या फेरीनंतरही सत्यजीत तांबे मतांच्या मोठ्या आघाडीवर आहेत. त्यामुळं तांबेंच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केली आहे.

पण यासाठी सत्यजीत तांबे हे ज्या कारमधून बसून आले आहेत. त्या कारची खासियत म्हणजे ती कार काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची आहे.

या निवडणुकीवरुन झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर थोरात प्रत्यक्ष या निवडणूकीत दिसले नाहीत पण त्यांच्या कारमुळं चर्चांना उधाण आलं आहे. (Nashik MLC Election Satyajeet Tambe near of victory Balasaheb Thorat car is in spotlight)

Satyajeet Tambe
Chaukidar Hi Chor Hain: अदानी प्रकरणानंतर 'चौकीदार ही चोर है' पुन्हा ट्रेंडिंगमध्ये!

MH 17 BX 567 या क्रमांकाच्या कारवर उभा राहून सत्यजीत तांबे कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करताना दिसत आहेत. याच कारचा वापर करत त्यांनी या निवडणुकीत प्रचार केला आणि विजय मिळवला आहे. या कारचा क्रमांक नगर, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील लोकांना चांगलाच माहिती आहे.

या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडायला लागल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी आजाराचं कारण देत या निवडणुकीपासून आपण लांब असल्याचं भासवलं आहे. कारण ते प्रत्यक्षात प्रचारात कुठेही नसले तरी काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा सत्याजीत तांबे यांच्या पाठीशी होती.

Satyajeet Tambe
ED Chargsheet: दिल्लीतील मद्य घोटाळ्याचा पैसा आपनं गोव्याच्या निवडणुकीत वापरला; ईडीचा खळबळजनक दावा

कारण सत्यजीत तांबे यांनी आपले मामा बाळासाहेब थोरात यांची कार संपूर्ण प्रचारादरम्यान वापरली. याचा अर्थ हाच की, यातून तांबेंना मतदारांना, काँग्रेस कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना जो संदेश द्यायचा होता तो देण्यात ते यशस्वी ठरले आणि आमदार बनण्याच्या जवळपास पोहोचले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com