‘तुम्ही खरचं शिवप्रेमी आहात हे दाखवून द्या’

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यासाठी सब्बलचा वापर होणे चुकीचे आहे
Navneet Rana and uddhav Thackeray
Navneet Rana and uddhav ThackerayNavneet Rana and uddhav Thackeray

अमरावती : येथील राजापेठ उड्डाणपुलावर राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati shivaji maharaj) मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आला. कोणाचीही परवानगी न घेता हा पुतळा बसविल्याने हटविण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी (uddhav Thackeray) तुम्ही खरचं शिवप्रेमी असाल तर कोणालाही पुतळा उभारण्याची परवानगी द्या, असे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने अमरावतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रविवारी सकाळपासून आंदोलन सुरू झाले. खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यासाठी सब्बलचा वापर केल्याचाही विरोध होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्याच्या पुतळा हटविण्यासाठी सब्बलचा वापर होणे चुकीचा असल्याचे, राणा दाम्पत्य म्हणाले.

Navneet Rana and uddhav Thackeray
यशोमती ठाकूर यांना शिवप्रेमी जागा दाखवून देईल - नवनीत राणा

शिवसेना (shiv sena) स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त म्हणतात. राज्यात त्यांचीच सत्ता आहे. असे असताना अमरावती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. याला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. मग ते खरे शिवप्रेमी असल्यावर संशय येते. त्यांच्याच दबावातून पुतळा हटविल्याचे, राणा (Ravi Rana) दाम्पत्य म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना याची माहिती होती

राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याचे अनेक चॅनलने दाखविले. आम्ही तिथे पूजा-अर्चना केली, हेही दाखविण्यात आले. मग याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांना होणार नाही, असे होऊच शकत नाही. त्यांच्या व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या दबावातून पुतळा हटविण्यात आल्याचे राणा दाम्पत्यांनी सांगितले.

Navneet Rana and uddhav Thackeray
भावासमोर बहिणीवर बलात्कार अन् बहिणीने उचलला टोकाचा पाऊल

मतदान मागतात आणि महाराजांचे पुतळे हटवतात

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati shivaji maharaj ) बसवण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. जे शिवभक्त परवानगी मागून थकले त्यांना परवानगी मिळाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांना तीन वर्षे परवानगी न मिळाल्याने आम्ही पुतळा बसवला. उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतदान मागतात आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवता, अशी टीकाही नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com