नवाब मलिक यांचा राजीनामा घेणारच : देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारला मलिक यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडू, असे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसe sakal

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा हेच आमचे उद्दिष्ट असून आम्ही रस्त्यावरील लढाई तर लढूच पण सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारला मलिक यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडू, असे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी म्हणाले. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप बुधवारी (ता.९) मोर्चा काढणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने मलिक यांना लक्ष्य केले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीचा व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मलिक अडचणीत आले आहेत. ते सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत.

देवेंद्र फडणवीस
ग्रामपंचायतीमध्ये नोंद नसताना १०० टक्के करवाढ; सामान्यांची फसवणूक

अशावेळी मलिक यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अर्थसंकल्पी अधिवेशनात मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. त्यानंतर आता या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे.

मुंबईच्या सत्तेचे गणित

भाजपच्या आक्रमक रणनितीमागे मुंबई महापालिका निवडणुकीचे कारण दडले असल्याचे बोलले जाते. या रणनितीमुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून सत्ता खेचता येईल,अशी भाजपने अटकळ बांधली आहे. त्यामुळेच भाजप मलिक यांच्या राजीनाम्यावरून आक्रमक झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com