जेव्हा अजित पवार, आदित्य ठाकरेंचं भरभरून कौतुक करतात!

टीम ई-सकाळ
Friday, 20 December 2019

नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अनेक किस्से घडत आहेत. आमदार एकमेकांवर धावून जाण्याचा प्रसंगही आहे आणि एकमेकांवर टोकाचे आरोप करण्याचा प्रसंगही आहे. या राजकीय कटुतेमध्ये काही हलके-फुलके प्रसंगही घडतात. त्यात कौतुक सोहळेही असतात. असंच एक कौतुक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलंय. ते म्हणजे, अजित पवार यांनी केलेलं आदित्य ठाकरे यांचं कौतुक.

नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अनेक किस्से घडत आहेत. आमदार एकमेकांवर धावून जाण्याचा प्रसंगही आहे आणि एकमेकांवर टोकाचे आरोप करण्याचा प्रसंगही आहे. या राजकीय कटुतेमध्ये काही हलके-फुलके प्रसंगही घडतात. त्यात कौतुक सोहळेही असतात. असंच एक कौतुक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलंय. ते म्हणजे, अजित पवार यांनी केलेलं आदित्य ठाकरे यांचं कौतुक.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'आदित्य अजिबात अहंकाराने वागत नाही'
आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आमदार झाले. सभागृहात ते सत्ताधारी पक्षाचं प्रतिनिधित्व करतात विशेष म्हणजे त्यांचे वडील राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण, आदित्य यांच्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. ही पोहोच पावती दिलीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी. नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांसाठी भोजन ठेवले होते. त्यादिवशी सभागृहाचं काम उशिरापर्यंत सुरू होतं. त्यामुळं भोजनाच्या ठिकाणी जायला सगळ्याच आमदारांना उशीर झाला. त्यात अजित पवारदेखील होती. अजित पवार आमदारांसह रात्री 12च्या सुमारास भोजनस्थळी पोहोचले. पण, आदित्य ठाकरे यांच्या देखरेखीखाली त्यांना गरम जेवण मिळाले. त्या ठिकाणचा आदित्य यांचा वावर पाहून अजित पवार प्रभावित झाले आणि त्यांचे आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. आदित्य ‌मुख्यमंत्र्यांचा मुलगा पण अजिबात अहंकाराने वागत नाही. बाळासाहेबांचा नातू आहे. पण, तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागतो. भोजनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आदित्यचं कौतुक केलं. 

वाचा - शाळांबाबत मुख्यमंत्र्यांचा तुघलकी निर्णय
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी -► क्लिक करा

नवोदितांवर सगळ्याचंच लक्ष
विधानसभेत अनेकजण पहिल्यांदा निवडून आले आहेत. सभागृहाच्या कामकाजाचा त्यांना पहिलाच अनुभव आहे. त्यात आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, रोहित पवार यांचा समावेश आहे. रोहित पवार यापूर्वी किमान जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळं त्यांना थोडापार सभागृहाचा अनुभव आहे. पण, इतर सदस्य हे अगदीच नवखे आहेत. तरुण फळीतील या नेत्यांच्या कामकाजावर त्यांच्या वावरावर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर सगळ्यांच लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader ajit pawar appreciate aditya thackeray at nagpur winter session