पुणे-पंढरपूर प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

वाल्हा, नीरा, पिसुर्टी ग्रामपंचायत तसेच जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, बारामती या आगारांनाही याबाबत पत्रे देण्यात आली आहेत.

गुळूंचे : पुरंदर तालुक्यातील नीरा ते वाल्हे दरम्यान असणारे रेल्वे फाटक (क्रमांक- 27) शुक्रवारी (ता.1) सकाळी सातपासून शनिवारी (ता.2) सायंकाळी सातपर्यंत बंद राहणार आहे.

पुणे-मिरज लोहमार्गावर नीरा ते वाल्हे दरम्यान पिसुर्टी येथे हे रेल्वे फाटक आहे. या फाटकाच्या परिसरातील रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे कामकाज करण्यात येणार आहे. तसेच रुळाच्या ओव्हर ऑईलिंगसाठी शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून ते शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत फाटक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे कळविली आहे. 

- संजय राऊत-शरद पवार भेट, महाराष्ट्रातील नवी राजकीय समीकरणं? 

रेल्वे गेट पुणे-पंढरपूर या राज्य महामार्गावर आहे. यामुळे फलटण, पंढरपूर, सांगोला, दहिवडी, गोंदवले आदी ठिकाणांवरून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या एसटी नीरा-गुळूंचे-राख-कोळविहीरे-जेजुरीमार्गे सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती नीरा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रमोद सोनवणे यांनी दिली.

- धक्कादायक! व्हॉट्‌सऍपद्वारे भारतीयांवर ठेवली जातेय पाळत

वाल्हा, नीरा, पिसुर्टी ग्रामपंचायत तसेच जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, बारामती या आगारांनाही याबाबत पत्रे देण्यात आली आहेत.

- पक्षाच्या आमदाराला पाडणाऱ्यालाच भाजपने घेतले सोबत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important news for travellers who travels Pune to Pandharpur via Phaltan