'छत्रपती शिवरायांचा उल्लेख केल्यानंतर फडणवीसांना राग का आला?'

ncp leader jayant patil attacks devendra fadnavis assembly over oath ceremony
ncp leader jayant patil attacks devendra fadnavis assembly over oath ceremony

मुंबई : मुख्यमंत्रिपदाची आणि मंत्र्यांची शपथ घेताना कोणी श्रद्धा स्थानाचं नाव घेतलं तर त्यात गैर काय? छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांची नावं घेऊन शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांना राग का यावा?, असा प्रश्न मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर त्यांनी सभागृहात आपले मत व्यक्त केले. 

जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विषयी पिढ्यान पिढ्या या व्यक्तींच्या मनात असुया आहे. जर, एखाद्याचं श्रद्धास्थान असेल आणि चांगल्या कामात तो त्याच श्रद्धा स्थानाचं नाव घेतलं तर त्यात काय वाईट आहे. चांगल्या गोष्टीसाठी असा अटकाव का?  आम्हाला ही विरोधीपक्ष नेता मजबूत असावा, असं वाटतं. पण, आज सभागृहात तुम्ही घोडे बाजाराला वाव दिला नाही. त्याबद्दल मी विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करतो. भाजपमध्ये विरोधीपक्ष नेते पद चंद्रकांत पाटील यांना मिळणार की, देवेंद्र फडणवीस अशी कदाचित स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठीच आज सभागृहात आज सगळा प्रकार घडल्याचं दिसत आहे.'

भुजबळ काय म्हणाले?
ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 'उद्धव ठाकरे आणि आम्ही शपथ घेताना, दैवतांचं नवा घेतलंय. संसदेत शपथ घेतानाही सदस्यांनी दैवतांची नावं घेतली होती. आता त्यांची शपथही रद्द केली तर, संसद रिकामी होईल. आम्ही सुरुवातीला आणि शपथेच्या शेवटी नावं घेतली. जी शपथ घ्यायची होती. ती आम्ही नीट घेतली आहे. त्यामुळं भाजपचा आक्षेप चुकीचा आहे.'

रशासमोर विरोधीपक्ष नेता
सभागृहात जवळपास दहा ते बारा नेत्यांनी भाषणे केली. त्यात काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही छोटे भाषण केले. त्यात त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. थोरात म्हणाले, 'गेल्या सभागृहावेळी फडणवीस यांचा आत्मविश्वास खूप होता. त्यांना विरोधीपक्ष नेता दिसत नव्हता. पण, मी त्यांना म्हणालो होतो की, आरशापुढे उभे रहा तुम्हाला विरोधीपक्ष नेता दिसेल.' थोरात यांच्या या टोल्यावर सभागृहात हशा पिकला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com