राष्ट्रवादीकडे 51 आमदार, अजित पवारांना मिळणार होते सर्वोच्च स्थान : पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

अजित पवार, अण्णा बनसोड आणि आत्राम या आमदारांची सही झालेली नाही. 162 आमदारांना राज्यपालांच्या समोर परेड करण्याची आमची तयारी आहे. राज्यपाल आज नाहीत म्हणून आम्ही आमदारांना आणलं नाही. अण्णा बनसोड हे पुण्यात असून आत्राम हेही संपर्कात आहेत. 

मुंबई : राज्यपालांकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या पत्रावर 54 पैकी 51 सदस्यांची सह्या आहेत. अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी पुन्हा जाणार आहे. अजित पवार यांना आमच्या वाट्याला येणार सर्वोच्च स्थान मिळणार, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर भाजपचा संभाव्य डाव उधळून लावण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन करण्याचा जोरदार हालचाली सुरू केल्या असून, आज (सोमवार) सकाळी 162 आमदारांच्या संख्याबळाचे पत्र राजभवनला नेऊन दिले. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे राजभवनात गेले. त्यांनी राज्यपालांच्या सचिवांना आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

भाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी 

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, की अजित पवार, अण्णा बनसोडे आणि आत्राम या आमदारांची सही झालेली नाही. 162 आमदारांना राज्यपालांच्या समोर परेड करण्याची आमची तयारी आहे. राज्यपाल आज नाहीत म्हणून आम्ही आमदारांना आणलं नाही. अण्णा बनसोडे हे पुण्यात असून आत्राम हेही संपर्कात आहेत. 

उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांचे बंड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Jayant Patil talked ajit pawar and NCP MLAs