जयंत पाटलांचं नवं ट्विट; 'राजकारणात शरद पवारांना हरवणे म्हणजे...'

टीम ई-सकाळ
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल ट्विट करत 'मी राष्ट्रवादीतच असून शरद पवारच आमचे नेते आहेत,' असे ट्विट केलेे होते.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तेचा सारीपाट खेळला जात आहे. आणि सोशल मीडियावरच्या मैदानातच सगळे आडाखे मांडले जात आहेत. सुरवातीला शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असणारे ट्विटयुद्ध आता भाजप-राष्ट्रवादी असे रंगताना दिसत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सायंकाळच्या सुमारास अजित पवार यांनी भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आणि त्यानंतर जवळपास भाजपच्या सर्वच महत्त्वाच्या मंत्र्यांचेही धन्यवाद मानले.

- काका-पुतण्यात 'ट्‌विट वॉर'; अजित पवारांचे म्हणणे शरद पवारांनी खोडले

त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल ट्विट करत 'मी राष्ट्रवादीतच असून शरद पवारच आमचे नेते आहेत,' असे ट्विट केलेे होते. त्यानंतर यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारेच भावनिक आवाहन केले होते. ''राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे, त्याचा आदर ठेवून आपण परत या,'' असे जयंत पाटील म्हणाले होते.

- फडणवीस-अजित पवारांचे सरकार बेकायदा

त्यानंतर आता आणखी एक ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. ''शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात कालही सूर्य होते, आजही आहेत व उद्याही कायम असतील,'' असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- विश्वासघात करणाऱ्यांसोबत लढणाऱ्या शरद पवारांचा मला अभिमान - सुप्रिया सुळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Jayant Patil tweeted about Sharad Pawar