‘मुंबई पोलिस आहेत म्हणून’, खासदार सुप्रिया सुळे यांचे सूचक ट्विट !

मंगेश कोळपकर
Thursday, 6 August 2020

मुंबईत अतिवृष्टी सुरू असतानाही कर्तव्य चोखपणे बजावणाऱया मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचकपणे अमृता फडणवीस यांच्यावर ट्विटद्वारे निशाना साधला आहे.

पुणे - मुंबईत अतिवृष्टी सुरू असतानाही कर्तव्य चोखपणे बजावणाऱया मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचकपणे अमृता फडणवीस यांच्यावर ट्विटद्वारे निशाना साधला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बॉलिवूडमधील अभिनेते सुशांतसिंग राजपूत यांनी केलेल्या आत्महत्येच्या तपासावरून सध्या वादंग सुरू आहे. बिहार पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस यांच्यात त्यात जुंपली आहे. या पाश्वर्भूमीवर सुळे यांनी गुरुवारी ट्विट केले. त्यात मुंबईत अतिवृष्टी सुरू असताना, वाहतूक नियमन करणाऱया एका पोलिसाचे पाठमोरे छायाचित्र त्यांनी त्यात समाविष्ट केले आहे. आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलिस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच...तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱया सेवाभावास सॅल्यूट, असे सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ऑनलाइन स्कुल फीसाठी निश्चित धोरण ठरवावे : कोणी केली शालेय शिक्षण मंत्र्यांना मागणी?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबद्दल मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल काही प्रश्न उपस्थित करून शंका व्यक्त केली होती. तसेच मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करीत नसल्याचेही त्यांनी सूचित केले होते. त्या ट्विटवरून अमृता फडणवीस या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. त्या मुळे सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणाने चर्चेत पुन्हा उसळी मारली होती. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करताना सूचकपणे अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा समाचार घेतला आहे.

न्यायालय केवळ तात्काळ प्रकरणांवर सुनावणी; पेंडिंग केसेसना होतोय उशीर

मुंबई पोलिसांचे कौतुक करणाऱ्या सुळे यांच्या ट्विटला नेटिझन्सनेही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. सुमारे पाच तासांत सुमारे 419 जणांनी ते ट्विट रिट्विट केले तर, तब्बल सुमारे साडेपाच हजार नेटिझन्सने त्या ट्विटला पसंती दर्शविली आहे. मुंबई पोलिस कार्यक्षम आहेतच. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणाऱ्यांना नेटिझन्सनी झोडपले आहे. सुशांतसिंग राजपूतच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून बिहारमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : मान-प्रसिद्धी देऊ शकत नाही दोनवेळची भाकर; कलाकारांवर आली बोंबिल-सुकट विकण्याची वेळ!

त्याच्या तपासासाठी बिहारमधून आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना मुंबईत विमातळाबाहेर पडताना, पोलिसांनी क्वारंटाईन केले आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रकारे मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या बिहारच्या मागणीला केंद्र सरकारने अनुकूलता दाखविली आहे. तर, सध्या भाजपशी संलग्न असलेले नारायण राणे यांनी सुशांतसिंगच्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader supriya sule twitter post mumbai police