पवारांना भोंदूबाबा म्हणणाऱ्या बावनकुळेंना राष्ट्रवादी-शिवसेनेचं उत्तर; म्हणाले, संमजसतेचा आव...

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकात्मक भाष्य केलं आहे.
Bavankule_Pawar
Bavankule_Pawar
Updated on: 

मुंबई : शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला असं वादग्रस्त विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. या आक्षेपार्ह टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून बावनकुळेंना उत्तर देण्यात आलं आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव आणि संजय राऊत यांनी त्यांना सुनावलं आहे. (NCP Shiv Sena reply to Chandrashekhar Bawankule who called Pawar Bhondubaba)

Bavankule_Pawar
T20 World Cup 2022 : "इथंतरी हिंदू-मुस्लिम करणं बंद करा"; भारतीय पत्रकाराला ऑस्ट्रेलियातील चाहत्यानं सुनावलं

भास्कर जाधव म्हणाले, भाजपचे नेते एका बाजूला साधनसुचितेचा आणि खूप मोठ्या संमजसतेचा आव आणतात की, आपण राजकारणातील कटुता संपवली पाहिजे, द्वेष संपवला पाहिजे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जर शरद पवारांबद्दल असं वक्तव्य केलं असेल तर भाजपचा फॉर्म्युला असा आहे की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. एकाबाजूला कटुता संपवूया द्वेष संपवूया असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला द्वेषमूलक वक्तव्य करायची ही भाजपची जुनी खोडचं आहे.

Bavankule_Pawar
Chandrashekhar Bawankule : शरद पवार भोंदूबाबा, त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला

संजय राऊत म्हणाले, "शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान करुन लक्ष आकर्षित करण्याची गरज जर भाजपला पडत असेल तर त्यांनी हे थांबवायला हवं. त्यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की आपलं कर्तृत्व काय आहे हे पाहावं. अशी विधानं आम्ही करत नाही तुम्ही करु नये"

रोहित पवारांची टीका

दरम्यान, अंधश्रद्धा आणि जादुटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळं संमत झाला त्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या साताऱ्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी जादूटोण्याची भाषा करणं पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. महाराष्ट्राचा तसेच या कायद्याचा अपमान करणारी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे?

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला तसेच शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आलं की त्याची सुटका होत नाही, असंही बावनकुळे म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत यायची स्वप्नं पाहू नयेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sharad Pawar latest statement on NCP merger and Maharashtra
Laxman Bandal Named State Vice President Of NCP Sharad Pawar Party Shashikant Shinde Hands Over Appointment Letter
Sharad Pawar Latest News
Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Marathi News Esakal
www.esakal.com