T20 World Cup 2022 : "इथंतरी हिंदू-मुस्लिम करणं बंद करा"; भारतीय पत्रकाराला ऑस्ट्रेलियातील चाहत्यानं सुनावलं

याची क्लीप फॅक्ट चेकर आणि ऑल्ट न्यूजचा सहसंस्थापक मोहम्मद झुबेरनं ट्विटरवर शेअर केला आहे.
India Vs England T20 World Cup 2022 Semi Final Rohit Sharma
India Vs England T20 World Cup 2022 Semi Final Rohit Sharma esakal

नवी दिल्ली : T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या T20 वर्ल्डकपमधील सेमीफायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून दारुण पराभव झाला. यावेळी भारतीय खेळाडूंना चाहत्यांसह मीडियाच्या टीकेचं धनी व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड इथं झालेल्या या सामन्यानंतर Zee न्यूजच्या टीव्ही पत्रकारानं तिथल्या काही भारतीय चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्यानं पत्रकाराला थेट म्हटलं की, "इथं तरी हिंदू-मुस्लिम करणं बंद करा" त्याच्या या टिप्पणीनंतर संबंधित चाहत्यामध्ये आणि पत्रकारात झटापट पहायला मिळाली. (T20 World Cup 2022 an Indian Cricket fan slams upon Indian Tv journalist in Australia)

चाहत्यामध्ये आणि पत्रकारात झटापट झाली तेव्हा टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण सुरु होतं. याची क्लीप फॅक्ट चेकर आणि ऑल्ट न्यूजचा सहसंस्थापक मोहम्मद झुबेरनं ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना झुबेरनं संबंधित चाहत्याचं म्हणणं अवतरण (कोट) केलं. या चाहत्यानं पत्रकाराशी बोलताना म्हटलं, "सर्वात पहिलं हा केवळ एक खेळ आहे. एकतर तो आपल्या हातात असेल किंवा त्यांच्या. हे लाईव्ह सुरु आहे का? हा Zee आहे का? कमीत कमी इथं तरी हिंदू-मुसलमान करणं बंद करा. तुमचा चॅनेल भारतातला सर्वात वाईट चॅनेल आहे"

India Vs England T20 World Cup 2022 Semi Final Rohit Sharma
Rajiv Gandhi : भारत जोडायला निघालेल्या राहुल गांधींच्या वडिलांच्या खुन्यांची मुक्तता

रोहित शर्माला ठरवलं गुन्हेगार

भारताच्या पराभवानंतर झी चॅनेलनं ऑस्ट्रेलियातील भारतीय चाहत्यांच्या प्रतिक्रियांचं लाईव्ह कव्हरेज चालवलं होतं. यावेळी चॅनेलच्या स्क्रीनवर देखील आक्षेपार्ह पद्धतीनं टीम इंडियाच्या खेळाडूंना गुन्हेगार असं संबोधण्यात आलं. यासाठी 'आज की हार का मुजरिम कौन?' असा मथळाही चालवला. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला 'शर्मनाक हर के गुनहगार' असं संबोधलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com