Monsoon Session : निलम गोऱ्हेंचं निलंबन नाहीच, सर्व अधिकार अबाधित राहणार; तालिका सभापतींनी दिलं स्पष्टीकरण

Neelam Gorhe
Neelam Gorheesakal

मुंबईः विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदेंना पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर उपमुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिले होते. परंतु आता त्यांच्या पदाला कुठालाही धोका नसल्याचा निर्णय तालिका सभापतींनी दिला आहे.

पक्षातरांच्या बाबतीत घेतलल्या आक्षेपात सभापती किंवा उपसभापती यांनी पक्षांतर केले तर ते अपात्र (निरह) ठरणार नाही. या पदाला तशी सूटही कायद्यात देण्यात आलेली आहे. निलम गोऱ्हे यांनी ज्या पक्षाला पाठिंबा दिला तो पक्ष बदलला नाही. चिन्ह व नाव हे त्याच पक्षाचे आहे.

Neelam Gorhe
Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीतील मदतकार्य तात्पुरतं थांबवलं! मुसळधार पावसामुळं अडचणी

विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निलम गोऱ्हे या कायम राहणार आहेत. पक्षांतराबाबतची तरतूद किंवा नियम आढळून येत नाहीत. म्हणून उपसभापती म्हणून गोऱ्हे यांचे संवैधानिक तरतूदीनुसार अधिकार अबाधित राहतील, असा निर्णय तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिला.

Neelam Gorhe
Kalyan Rain : 24 तास उलटले तरीही चिमुरडी बेपत्ताच; बाळाच्या धसक्याने आई आजारी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या पदावर आक्षेप नोंदवला. परंतु आता तालिका सभापतींनी निर्णय देत निलम गोऱ्हे पदावर राहतील, असं सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com