esakal | मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आता 1 सप्टेंबरला...
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आता 1 सप्टेंबरला...

मराठा आरक्षणवरील सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आता महिनाभरानंतर  म्हणजेच १ सप्टेंबरला होणार आहे

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आता 1 सप्टेंबरला...

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

नवी दिल्ली : मराठा आरक्षणवरील सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी आता महिनाभरानंतर म्हणजेच १ सप्टेंबरला होणार आहे. आरक्षणावरील सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे करण्याची मागणी याचिकादार विनोद पाटील यांनी केली आहे. यावर 25 ऑगस्टरोजी सुनावणी होणार आहे.

काय म्हणालेत विनोद पाटील : 

कोरोना काळात राज्य सरकारकडून कोणतीही भरती केली जाणार नाही,  असे परिपत्रक सरकारने जारी केले आहे. याबाबतची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. न्यायालयाने हे विधान नोंदवून घेतले. पाटील यांच्या मागणीला राज्य सरकारनेही समर्थन दिलं आहे. दरम्यान पाच न्यायाधिशांच्या मागणीवर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. जर ही मागणी मान्य झाली तर सुनावणी पाच न्यायाधिशांच्या खंडपीठापुढे होणार आहे. दरम्यान, न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नाही, असे समन्वयक पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारने सामाजिक आर्थिक मागास गटात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले आहे. उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध ठरविले आहे. याविरोधात अनेक अपिल याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या वाचा 

१. सतत हात धुताय ? वेळीच सावधान व्हा, कारण हे 'या' आजाराचं असू शकतं लक्षण 

२. कोरोना रुग्णांवर 'ही' थेरेपी ठरतेय अत्यंत उपयुक्त सहाय्यक उपचार पद्धती ! घरीही करू शकता...

३. मुख्यमंत्र्यांच्या स्टिअरींच्या विधानांनंतर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवारांकडून सूचक फोटो ट्विट

( संपादन - सुमित बागुल )

next hearing on maratha reservation will be on 1st September 2020 says supreme court 

loading image