deepak kesarkar nilesh rane
deepak kesarkar nilesh rane Sakal

आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी; निलेश राणेंची केसरकरांना ऑफर

यानिमित्ताने राणे पितापुत्र आणि दीपक केसरकर यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

राणे पितापुत्र आणि दीपक केसरकर यांचा आधीपासूनच ३६ चा आकडा आहे. अनेकदा यापूर्वीही त्यांच्यात खटके उडाले आहेत. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बाजू घेतल्याने या वादाला आणखी हवा मिळाली आहे. त्यातच आता निलेश राणेंनी एक ट्वीटही केलं आहे.

deepak kesarkar nilesh rane
दीपक केसरकरांना आवरा, राणे समर्थकांची फडणवीसांकडे मागणी

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याविषयी निलेश राणेंनी हे ट्वीट केलंय. निलेश राणे म्हणतात, दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. नोकरी मागायची आहे, तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे. आता त्यांच्या या खोचक ऑफरवर दीपक केसरकर काय प्रतिक्रिया देतायत हे पाहण्यासारखं आहे.

काय म्हणाले होते दीपक केसरकर?

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी राणेंनी प्रयत्न केले, असा खळबळजनक आरोप दीपक केसरकर यांनी केला होता. त्यानंतर दीपक केसरकर यांना चांगलीच तंबी दिल्याचं समजत आहे. शिंदे गट आणि भाजपाच्या रोषाचा सामना यानिमित्ताने दीपक केसरकरांना करावा लागत असल्याचं दिसतंय. त्यांचं प्रवक्तेपदही आता किरण पावसकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com