दिशा सालियान मृत्यूप्रकरण अन् सचिन वाझेचं कनेक्शन? नितेश राणेंचं खळबळजनक ट्विट|Disha Salian Death Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitesh Rane on Disha Salian Death Case

दिशा सालियान मृत्यूप्रकरण अन् सचिन वाझेचं कनेक्शन? नितेश राणेंचं खळबळजनक ट्विट

मुंबई : सुशांतसिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणावरून (Disha Salian Death Case) नारायण राणेंनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हा मुद्दा परत एकदा चर्चेत आला. याबाबत मुंबईच्या महापौरांनी (Mumbai Mayor) राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यानंतर आता नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सकाळीच ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. दिशा सालियान मृत्यूप्रकरण आणि सचिन वाझेचं कनेक्शन आहे का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: दिशा सालियान मृत्यूचा CBI मार्फत तपास करा, सुशांतच्या मित्राची मुंबई हायकोर्टात याचिका

दिशा सालियानप्रकरणात मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासून संशयास्पद दिसतेय. आता त्यांना याप्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. आठ जूनच्या रात्री उपस्थित असलेला आणि दिशासोबत राहत असलेला रोहन रॉय सर्वांसमोर येऊन का बोलत नाही? दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आले ती कार वाझेची आहे का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं. त्यावरून देखील नितेश राणे यांनी टीका केली आहे. मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं. त्यानंतर आयोगानं मालवणी पोलिसांनी अहवाल सादर करण्यास सांगितला. यावरून ८ जूनच्या रात्री काहीच घडलं नाही, असं दाखवून हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, असं करून ते स्वतःसाठीच खड्डा तयार करत आहेत, असंही नितेश राणे म्हणाले.

सचिन वाझेचं काय कनेक्शन? -

दिशाला ८ जूनच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडे देखील अशीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. या दोन्ही प्रकरणात वापरलेली कार एकच आहे का? ९ जूनला सचिन वाझेला पोलिस दलात पुन्हा रुजू करण्यात आले. त्यामुळे सचिन वाझे आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचं काही कनेक्शन आहे का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. मालवणी पोलिसांनी निष्पक्ष तपास न केल्याने प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले आहे आणि आता त्याच पोलिस ठाण्याला राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले? ते कितपत न्याय्य आहे? हे कोणाला वाचण्याचा प्रयत्न करत आहे? असंही नितेश राणे म्हणाले.

Web Title: Nitesh Rane Allegations On Thackeray Government Disha Salian Death Case Sachin Waze Connection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :nitesh ranesachin waze
go to top