Nitesh Rane News : संतोष परब हल्ल्याच्या कटाबद्दल वकिलांचा खळबळजनक आरोप, म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane

संतोष परब हल्ल्याच्या कटाबद्दल वकिलांचा खळबळजनक आरोप, म्हणाले..

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक येथे शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (santosh parab) यांच्यावर निवडणुकीपुर्वी हल्ला झाला होता. याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आज (मंगळवार) राणेंच्या (Nitesh Rane Latest Marathi News) जामीन (bail) अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात (Sindhudurg District Court) सुनावणी सुरु होती. दरम्यान,आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी आज पूर्ण झाली असून उद्या याबाबतचा निर्णय देण्यात येईल, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी सांगितले.

याप्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी यांनी तर बचाव पक्षाच्यावतीने वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला. (Nitesh Rane Bail Updates) दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश हांडे यांनी निकाल उद्या जाहीर केला जाईल असे जाहीर केले आहे. सुनावणीपुर्वी झालेल्या युक्तीवादात दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणेंच्या वकीलांवर दादागिरीचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजू समजून घेत प्रत्यक्ष जामीन अर्जावर सुनावणीस प्रारंभ केला. (Nitesh Rane Bail Application Live Updates)

हेही वाचा: सरकारी वकिलांनी मागितली वेळ; नितेश राणेंची सोमवारी होणार सुनावणी

यावेळी आमदार राणेंचे वकिल संग्राम देसाई युक्तीवाद करताना म्हणाले, सुपारी देऊन हल्ला करायाला लावला असे मोठं मोठे शब्द सरकार पक्षाकडून वापरले जात आहेत. पैसे दिले घेतले असा पोलिस तपासात कुठेही उल्लेख नाही. (Sindhudurg) धीरज जाधवला सचिन सातपुतेने १० हजार दिले होते आणि सरकार पक्ष एक लाखाला सुपारी दिली असे म्हणत आहे. याबरोबरच नितेश राणे यांच्यावर ११ आणि राकेश परबवर यांच्यावर २ केस असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र यातील अनेक खोट्या केसेस असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची केस नाही. सर्व केस राजकीय नाहीत. नितेश राणेंवर सर्व खोट्या केस दाखल आहेत. राजकीय दबावातून अशा केस केल्या जात आहेत. अनेक केसमध्ये साक्षीदार येऊन गेले आहेत पण त्यांनी नितेश राणे यांचं नाव घेतलं नाही असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: 'कोरोनात मोदींनी जनतेला सुविधा दिल्या, तुम्ही काय दिलं?'

Web Title: Nitesh Rane Bail Application District Court Declare Dicision Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..