

New expressway connecting Mumbai to Pune
ESakal
केंद्र सरकारने १.५ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्यामुळे महाराष्ट्रातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये प्रवास आणि गतिशीलता वाढविण्यासाठी अभूतपूर्व सुधारणा होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेची घोषणा केली. ज्याचा उद्देश राज्यभरातील प्रवाशांचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता सुधारणे आणि वाहतूक कोंडी कमी करणे आहे.