नाशिकसह 4 ठिकाणी मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; नितीन गडकरींची घोषणा

दिघी बंद येथेही हे पार्क साकारले जाणार.
nitin gadkarai
nitin gadkaraiEsakal

नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या १२२ किलोमीटरच्या सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गावरील (Surat Chennai Greenfield Express Highway) महापालिका हद्दीतील आडगाव शिवारात शंभर एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क (Logistic Park) उभारण्याच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी देण्यात आली होती. लॉजिस्टिक पार्कचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अनुदानासाठी सादर केला होता.

नाशिक (Nashik) दौऱ्यावर आलेल्या केंद्रीयमंत्री गडकरी यांनी एका कार्यक्रमात नाशिकबद्दल प्रेम व्यक्त करताना शहर विकासात इकॉनॉमिक्स व इकोलॉजीचा समतोल राखण्याचे आवाहन केले होते. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari) नाशिकमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क साकारणार असल्याची घोषणा मुंबईत केली. नाशिकसोबतच मुंबई, पुणे, औरंगाबाद (Mumbai, Pune, Aurangabad) आणि दिघी (Dighi) बंद येथेही हे पार्क साकारले जाणार असल्याची माहिती त्यांनी आज मुंबईत दिली आहे. (Logistic Park Permission in Nashik)

दरम्यान, शहराचा विस्तार होत असताना वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यावर पर्याय म्हणून दिल्लीच्या धर्तीवर नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मीरा भाईंदर, भिवंडी व बदलापूर येथे केंद्र सरकारकडून लॉजिस्टिक पार्कची अंमलबजावणी केली जात आहे. नाशिकमधून सुरत- चेन्नई ग्रीनफिल्ड मार्ग जात असल्याने या १२२ किलोमीटर महामार्गाच्या शहर परिसरात महापालिकेने जागा खरेदी करून रस्ते विकास मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविल्यास लॉजिस्टिक पार्कसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. अखेर आज याला हिरवा कंदील मिळाला.

लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय ?

औद्योगिक वसाहती असतात, त्याठिकाणी लॉजिस्टिक पार्कची आवश्‍यकता असते. कारखान्यामध्ये तयार होणारे उत्पादन लॉजिस्टिक पार्कमधील गोदामामध्ये ठेवण्यात येते. कार्गोची सुविधा, उत्पादनाचे ग्रेडिंग, वितरण, साठवणूक, फ्रेट स्टेशन आदी सुविधा उपलब्ध असतात. राज्य सरकारने तयार केलेल्या धोरणामध्ये या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. लॉजिस्टिक पार्कला करण्यात येणारा विजेचा पुरवठा हा उद्योगांच्या दराने करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या आडगाव शिवारात अनुक्रमे ५० व १३ एकर, असे एकूण ६३ एकर जागेत लॉजिस्टिक पार्क तयार होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com