
पुणे ते बेंगलोर फक्त साडेतीन तासात? गडकरी होतायत ट्रोल
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या कामाप्रती सतत चर्चेत असतात. त्यांची भाषणे तर कधी कधी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. रस्त्यांबद्दल त्यांची आश्वासने असो किंवा रस्ते बनविण्यात त्यांनी केलेले रेकॉर्ड सतत चर्चेचा विषय असतात.
अशातच पुणे येथे वसंतदादा शुगर इन्सिट्युटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी भाषणात नितीन गडकरी असे काही बोललेत की ते आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. (nitin gadkari is being trolled due to his statement on pune banglore highway will cover in three and half hour)
हेही वाचा: Rajya Sabha Election : सपानं वाढवलं CM उद्धव ठाकरेंचं टेन्शन!
या कार्यक्रमात बोलताना नितिन गडकरी म्हणाले होते की आता पुणे ते बेंगलोर फक्त साडेतीन तासात प्रवास करता येणार असा महामार्ग काढणार आहे. मग काय, त्यांच्या या विधानाला नेटकऱ्यांनी चांगलेच घेरले आणि यावर थेट मिम्स बनविण्यास सुरवात केली.
सध्या हे मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नितीन गडकरी यामुळे ट्रोल होत आहे. नेटकरी त्यांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
हेही वाचा: रणनीती ठरलीये, राज्यसभेचा गुलाल महाडिकच उधळणार, गिरीश महाजनांचा दावा
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी साखर परिषद पार पडली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह बाळासाहेब पाटील दिग्गजांची उपस्थिती होती.
Web Title: Nitin Gadkari Is Being Trolled On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..