सांगलीच्या रस्त्यावर उतरतील विमानं; नितीन गडकरी असं का म्हणाले?

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (Maharashtra Chamber of Commerce) आयोजित 'महाराष्ट्राच्या विकासवाटा' या चर्चासत्रामध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) उपस्थित होते.
Nitin Gadkari
Nitin Gadkarisakal

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (Maharashtra Chamber of Commerce) आयोजित 'महाराष्ट्राच्या विकासवाटा' या चर्चासत्रामध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) उपस्थित होते. विकास आपल्यालाच करावा लागतो, नुसते रडून चालत नाही असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या विविध विकासकामांबद्दल माहिती दिली.

केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) नुकताच सादर झाला असून, या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नवीन अर्थसंकल्पीय दृष्टीकोनातून महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकास वाटा हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.

Nitin Gadkari
खासदार उदयनराजेंच्या 'त्या' प्रस्तावाला नितीन गडकरींची मंजुरी

यावेळी बोलताना नितीन गडकरींनी विविध गोष्टींना हात घातला. गडकरी म्हणाले की, “विकास आपलाच आपल्याला करायला लागतो. विदर्भातील लोकांनी रडायचे नाही. लग्न आपण करायचे आणि पोरग नाही झालं तर रडायचे. विकास नाही केला तर शिक्षण संस्था काढाव्या लागतात. शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही अर्धा आम्ही आणि मग काय रोजगार हमी अशी पंचायत होते. त्यामुळे प्रत्येकाने आपला विकास आपण करायला हवा.”

यावेळी महाराष्ट्रात चाललेल्या विविध विकासकामांची माहितीही लोकांना दिली. सातारा ते कोल्हापूर हा रस्ता 6 पदरी रस्ता होणार असून याला मंजुरी मिळाली आहे तसेत पुणे ते सातारा खंबाटकी टनेल बांधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातमध्ये 22 ग्रीन हायवे आम्ही देशात बांधत आहोत असंही गडकरी म्हणाले. या रस्त्यांचा दर्जा इतका उत्तम असेल की त्यावर विमानही उतरू शकेल असंही गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
दिल्ली-जेएनपीटी हायवे झाल्यास ठाण्याची वाहतूक कोंडीतून सुटका - नितीन गडकरी

मुंबईत (Mumbai) इलेक्ट्रॉनिक बस घ्याव्यात यासाठी मी 3 वर्ष मागे लागलो, आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्या घेतल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक बसला एका किलोमीटरला 50 रुपये खर्च होतो तर डिझेल बसला 10 रुपये खर्च होतो. त्यामुळे खूप बचत होईल असंही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com