Hyderabad Encounter : वकील म्हणतात, 'हा कायदेशीर न्याय नाही'

This is not legal justice said Lawyers in Hyderabad Encounter case
This is not legal justice said Lawyers in Hyderabad Encounter case

पुणे : ''हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचे एन्काऊंटर केल्याने स्थानिक पोलिसांचे देशभरातून कौतुक होत आहे. मात्र वकिलांनी हा प्रकार घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. आरोपींना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी होती. हा कायदेशीर न्याय नाही'', अशी प्रतिक्रिया येथील वकिलांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा :  ही तर आणीबाणीची वेळ; न्यायव्यवस्थेत बदल झालाच पाहिजे

''कायदा आणि कायद्याची प्रक्रिया आपणच संविधानाद्वारे प्रस्तापित केली आहे. ही प्रकिया पाळली पाहिजे, असे नागरी बंधन आपल्यावर आहे. त्यामुळे एन्काऊंटर हे बेकायदेशीरच आहे. पोलिसांनी देखील कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन केले पाहिजे. आरोपीला काय शिक्षा द्यायची हे न्यायालय ठरवेल. पोलिसांनी न्यायाधीशांची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. लोकांच्या भावना लक्षात घेता न्यायालये बंद करून सर्व अधिकार पोलिसांना द्यायचे का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. शिक्षा देवून प्रश्‍न सुटत नाहीत.''
- अॅड. असीम सरोदे

'आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार', एन्काउंटरनंतर हैद्राबाद पोलिसांची पत्रकार परिषद

''या गुन्ह्यातील आरोपींचा खटला चालवून त्यांना कायद्याने दिलेले अधिकार मिळायला हवे होते. एवढ्या सकाळी त्यांना घटनास्थळी नेण्याची गरज होती, असे मला वाटत नाही. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने विचार केला हा सर्व घटनाक्रम नाट्यात्मक दिसतो. मात्र आरोपींचा एन्काऊंटर केल्याने अशा प्रकारचा गुन्हा करणा-यांना जरब बसणार आहे.''
- अॅड. अमोल डांगे

हैदराबाद घटनेने अंर्तमुख होऊन  विचार करावा लागेल : ऍड उज्वल निकम  

''एन्काऊंटरचे नागरिकांकडून झालेला स्वागत नैतिक विजयासाठी चांगले आहे. मात्र कायद्यानुसार न्याय झाला का? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. पोलिसांनी सादर केलेल्या वस्तुस्थितीची सत्यता संशयाची भावना निर्माण करते. ही "कस्टोडियल किलिंग' आहे, असे जाणवते. मी आरोपीला पाठिंबा देत नाही. पण कायदा प्रत्येक व्यक्तीला त्याची बाजू सिद्ध करण्याचा अधिकार देतो. आरोपींकडून तो हक्क काढून घेण्यात आला आहे.''
- अॅड. पुष्कर पाटील

हैदराबाद एन्काऊंटर हा भयानक प्रकार: मनेका गांधी

''पोलिसांनी आरोपींचा केलेला एन्काऊंटरचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. येत्या काळात त्यातून समाजात चुकीचा संदेश जाईल. यापुढील प्रत्येक घटनेतील आरोपींना अशाच प्रकारे मारण्याची मागणी होईल. त्यातून एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. पोलिसांना कोणाला शिक्षा देण्याचा अधिकार नाही. ते काम न्यायालयाचे आहे.
- अॅड. विकास शिंदे 

#HyderabadEncounter : पोलिसांच्या भूमिकेवर प्रविण तरडे काय म्हणाले !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com