आता एसटी बसमध्ये बसवणार लवकरच पडदे

आता एसटी बसमध्ये बसवणार लवकरच पडदे

मुंबई - कोरोनामुळे बंद असलेली एसटीची सेवा २० ऑगस्टपासून सुरू झाली आहे; मात्र ५० टक्केच प्रवासी वाहतूक सुरू असल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे भविष्यात एसटीची १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने एसटीने बसमधील आसनांच्या मध्ये पडदे लावण्याचा प्रयोग केला असून, राज्य सरकारच्या परवानगीनंतरच महामंडळातील इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एसटीच्या आसनामध्ये आता पडदे बसविण्यात येणार आहेत. सध्या मुंबई, पुण्यातील अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या बसमध्ये हा प्रयोग केला आहे. त्यानंतर याला एसटी महामंडळाची तांत्रिक आणि राज्य सरकारची मान्यता मिळाल्यास राज्यभरातील विभागांमध्ये या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देखभालीचे काय?
कोरोनामुळे रेल्वेने त्यांच्या एसी कोचमधील ब्लॅंकेट, चादर, उशी आणि टॉवेल सुविधा सध्या बंद केल्या आहेत. कोरोनानंतरही या सुविधा नियमित बंद ठेवण्यासाठी रेल्वेच्या विचाराधीन आहे. शिवाय सद्यःस्थितीत रेल्वे कोचमधील खिडक्‍यांचे पडदेही काढले आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेस्ट, रिक्षामध्ये प्रवासी व चालकांच्या मध्ये प्लॅस्टिक शिट्‌स बसविले जात असताना एसटीत पडदे बसविले जाणार आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकऐवजी कापडी पडदे लावल्यास देखभालीचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

वेतनासाठी दोन हजार कोटी द्या
लॉकडाउनमुळे एसटीचे सुमारे ३५०० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही आर्थिक स्थिती नसल्याने राज्य सरकारने एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दोन हजार कोटींची मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्य एसटी कामगार संघटनेने केली आहे.लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे कामगारांना वेतन देणे महामंडळास अशक्‍य होत आहे. 

कोरोनामुळे सध्या पडदे लावलेल्या बस अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणाऱ्या बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग केला जात आहे. त्यानंतर एसटी महामंडळातील तांत्रिक मान्यता आणि राज्य सरकारच्या मान्यतेनंतर याची एसटी महामंडळात अंमलबजावणी केली जाणार आहे.
- राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com