Covid-19
Covid-19Team eSakal

Omicron: हाय रिस्क देशांतून आलेले 17 जण क्वारंटाईन

मुंबई महानगर पालिकेने ही माहिती दिली आहे.
Published on

मुंबई: कोरोना (Covid-19) महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर आता जगासमोर ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिअंटमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काल देशातला चौथा आणि राज्यातला पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळला आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय.

अफ्रिकन देशांतून समोर आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून जगभरात प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. त्यातच आता हाय रिस्क असलेल्या देशांतून आलेले तब्बल 17 प्रवाशांना मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आलं आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

Covid-19
नवीन विषाणूबाबत सरकार सावध : डॉ. पवार

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त इक्बाल सिंग चहल म्हणाले, की प्रशासनाने परदेशातून परतलेल्या प्रवाशांचं संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची सर्व व्यवस्था केली आहे. राज्य सरकारच्या नियमांनुसार, दक्षिण आफ्रिकेतील सर्व देशांकडे ओमिक्रॉनच्या दृष्टीने हाय रिस्क झोन म्हणून पाहिलं जातंय, त्यामुळे त्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांकडे मनपाचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com