Onion Price Crash: कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी; कवडीमोल भावात विकावा लागतोय कांदा, कारण...

देशातील एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
Onion Price Crash
Onion Price CrashSakal

Onion Price Crash: भारतात कांद्याचे भाव पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अवकाळी पाऊस. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागात पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकावा लागला आहे. अशा स्थितीत भारतातील कांद्याचे भाव 5 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत (Onion Price Crashed).

शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागला :

देशातील एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. अशा स्थितीत मार्च महिन्यात पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक ठिकाणी कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकर्‍यांमध्ये कांद्याच्या गुणवत्तेची चिंता वाढली असून घाबरून ते प्रत्यक्ष किंमतीपेक्षा खूपच कमी दराने कांदे विकत आहेत. तज्ज्ञांच्या मते, शेतकरी लवकरात लवकर कांदा विकण्यासाठी मोठ्या संख्येने एपीएमसी मंडईत पोहोचत आहेत.

त्यामुळे बाजारात अचानक कांद्याचा साठा वाढला असून कांद्याचे भाव कमालीचे खाली आले आहेत. यासोबतच शेतकऱ्यांनी निकृष्ट दर्जाचा कांदा चार-सहा महिने साठवून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास कांद्याला 15 रुपये किलो दराचा फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसू शकतो.

Onion Price Crash
Onion Subsidy : कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू

70 टक्के कांदा खराब झाला :

लाइव्ह मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दररोज 24 हजार टन कांदा शेतकरी नाशिकच्या मंडईत आणत आहेत. यामध्ये 70 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. मार्च ते मे या कालावधीत रब्बी कांद्याची काढणी केली जाते.

भारतातील एकूण कांद्याच्या उत्पादनात त्याचा वाटा 65 ते 70 टक्के आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कांद्याचा भाव 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल आहे. तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला 500 ते 600 रुपये भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना निम्म्या भावाने कांद्याची विक्री करावी लागत आहे.

अवकाळी पावसाने कांदा पिकाची नासाडी केली :

यावर्षी एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 308 टक्के जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे कांदा पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे. गेल्या वर्षी 2022-23 मध्ये रब्बी हंगामात 22.9 मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले होते.

यावर्षी ते 23.5 मेट्रिक टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परंतु पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता कमी दिसत असली तरी कांद्याचा दर्जा कमी होईल.

Onion Price Crash
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com