Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाने गाठला तळ; राज्यावर वीजनिर्मितीसह पाणी टंचाईचं संकट

जून महिना संपत आला, तरी मॉन्सूनचा (Monsoon) अद्याप पत्ताच नाही.
Koyna Dam
Koyna Damesakal
Summary

कोयना धरणाच्या इतिहासात २० टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा आजपर्यंत पाच वेळा पाहायला मिळाला आहे.

पाटण : जून महिना संपत आला, तरी मॉन्सूनचा (Monsoon) अद्याप पत्ताच नाही. खरीपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. १९७२ मधील दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होणार, असे चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणीसाठ्याने तळ गाठला आहे.

धरणात उपयुक्त पाणीसाठा फक्त ६.७८ टीएमसी आहे. पावसाने (Rain) लवकर हजेरी न लावल्यास येत्या दोन दिवसांत धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच १० टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा पाहायला मिळेल, अशी परिस्थिती आहे.

Koyna Dam
Indian Army : 11 महिन्याच्या बाळाचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच जवान सूरज यादव यांचं निधन, गावावर शोककळा

कोयना धरणाची पाणीसाठा साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. धरणाचा मृत पाणीसाठा पाच टीएमसी व उपयुक्त पाणीसाठा १००.२५ टीएमसी आहे. गतवर्षी मुसळधार पावसामुळे जलाशयात एकूण १५९.७६ टीएमसी पाण्याची आवक झाली होती. त्यापैकी पश्चिमेला वीज निर्मितीसाठी ८२.६४ टीएमसी पाणी वापर झाला आहे. ६८.५० टीएमसी वीज निर्मितीसाठी पाणी वापर बंधनकारक आहे.

Koyna Dam
Satara Politics : आम्हाला बेअक्कल म्हणता, मग लोकसभेला का पडलात? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर निशाणा

मात्र, अतिवृष्टी काळात पाणीसाठा नियंत्रणासाठी १४.१४ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले आहे. ७.८४ टीएमसी पाण्याचे वर्षभरात बाष्पीभवन झाले. सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी पूर्वेकडे २१.७० टीएमसी पाणी सोडले आहे. धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या रिव्हर स्लुईस गेटमधून १.१८ टीएमसी पाणी सोडले आहे.

Koyna Dam
Koyna Dam : प्रमुख धरणांत फक्त 15.96 टीएमसी साठा; पाणी-विजेचं संकट, कोयनेतील विसर्ग होणार बंद

एक जूनला अहवाल वर्ष संपले, त्यावेळी १६.२० टीएमसी पाणीसाठा होता. आज २० दिवस झाले, तरी मॉन्सूनचा पत्ता नसल्याने व धरण पाणलोट क्षेत्रात कोयनानगर येथे ७७ मिलिमीटर, नवजाला ८३ मिलिमीटर व महाबळेश्‍वरला १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी कर्नाटकसाठी पिण्याच्या पाण्यासाठी एक टीएमसी व यावर्षीही एक टीएमसी पाणी सोडले आहे.

पाच वेळा २० टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा

कोयना धरणाच्या इतिहासात २० टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा आजपर्यंत पाच वेळा पाहायला मिळाला आहे. २२ जून २०१७ रोजी १६.३० टीएमसी, एक जुलै २०२२ रोजी १३.५५ टीएमसी, ११ जुलै २०१४ रोजी १२.५५ टीएमसी, २९ जून २०१६ रोजी १२.१८ टीएमसी आणि २७ जून २०१९ रोजी सर्वात कमी १०.१३ टीएमसी धरणात पाणीसाठा पाहायला मिळाला आहे.

Koyna Dam
विषयच हार्ड! कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्या 32 कारागिरांना GI प्रमाणपत्र; राष्ट्रीय स्तरावर मान्यता

जलाशयात आज एकूण ११.०३ टीएमसी पाणीसाठा असून, दोन दिवस पावसाचे आगमन न झाल्यास धरणाच्या इतिहासात प्रथमच १० टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा पाहावा लागणार आहे. वीजनिर्मितीचा चौथा टप्पा बंद पडला आहे. उपयुक्त ६.७८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, शिल्लक पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. मॉन्सून येत्या काही दिवसांत न आल्यास राज्यासमोर वीजनिर्मिती बरोबर पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची भीती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com