Ajit Pawar : अजित पवार घाबरून बसणारा नाही ; विरोधी पक्षनेत्यांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar responded to Chandrakant Patil

Ajit Pawar : अजित पवार घाबरून बसणारा नाही ; विरोधी पक्षनेत्यांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Ajit Pawar : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. अजित पवार अधिवेशनानंतर चार दिवस कुठे लपून बसले होते, असा खोचक सवाल चंद्रकांत पाटलांनी केला होता. (ajit pawar responded to Chandrakant Patil)

अजित पवार यांना उठसूठ लोकांना टपली मारण्याचा अधिकार दिलेला नाही. लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. एखाद्या गोष्टीवर किती मोठी प्रतिक्रिया येते. याचा अनुभव अजित पवार यांनी घेतला आहे. अजित पवार कुणाला घाबरत नाहीत तर चार दिवस कुठे लपून बसले होते, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता, यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले, "अधिवेशन शुक्रवारी संपले. शुक्रवारी मी माध्यमांशी संवाद साधला. शनिवारी मुंबईला आलो. रविवारी नवीन वर्ष होतं आणि २ जानेवारीपासून पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यामुळे मी कुठे घाबरुन बसलो होतो. कुणीही टीका केली तरी तुम्हाल कळलं पाहीजे टीकेत तथ्य आहे की नाही. अजित पवार घाबरुन बसणारा नाही."

हेही वाचा: Chandrakant Patil : जे झोपलेले त्यांना...; सुप्रिया सुळेंच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

वेगवेगळ्या पक्षाच्या एक नंबरच्या नेत्यानी बसून महाराष्ट्र राजकारणावर आचारसंहिता लिहिली पाहिजे, ती अजित पवार यांना पण लागू होईल. तुम्ही चार दिवस लपून बसला होता, घाबरला होता. दुसऱ्यांच्या गरावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो, याची जाणीव असली पाहिजे. एकमेकांना आदर देता आला पाहिजे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule : ...म्हणून मी 'औरंगजेबजी' म्हणालो ; राऊतांच्या रोखठोकनंतर बावनकुळेंचे स्पष्टीकरण