
पंकजा मुंडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलीय.
पंकजा मुंडे- अमित शाह भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना चर्चांना उधाण
नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केलीय. ही भेट नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असते, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलंय. मात्र, या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.
पंकजा मुंडे या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. काल भाजपच्या बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर, त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर गृहमंत्र्यांशी चर्चा केली.
हेही वाचा: 'मुस्लिमांचा अल्लाह बहिरा आहे, त्यामुळं मोठ्यानं ओरडून सांगावं लागतं'
या भेटीचं ट्विट त्यांनी केलंय. 'आमचे नेते, देशाचे प्रभावी गृहमंत्री आणि सहकार क्षेत्राला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाणारे अमितभाई शहा यांची भेट नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असते', असं मुंडेंनी म्हटलंय. परंतु, या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.
Web Title: Pankaja Munde Met On Union Home Minister Amit Shah Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..