हिवाळी अधिवेशन : पेपरफुटी प्रकरणी फडणवीसांनी सरकारला विचारले पाच प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnvis
पेपरफुटी प्रकरणी फडणवीसांनी ठाकरे सरकारला विचारले पाच प्रश्न

पेपरफुटी प्रकरणी फडणवीसांनी ठाकरे सरकारला विचारले पाच प्रश्न

मुंबई : राज्यातील विविध नोकर भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Govt) पाच प्रश्न विचारले. तसेच यावर सविस्तर चर्चा घेण्याची मागणी केली. त्यांच्या यामागणीला सत्ताधारी पक्षातील काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी पाठिंबा दर्शवला तसेच विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Zirval) यांनी यावर उद्या चर्चा घेण्याचं मान्य केलं.

फडणवीसांनी प्रश्न उपस्थित करताना अध्यक्षांकडे मागणी केली की, पेपरफुटी प्रकरणी एवढा मोठा घोटाळा झाला आहे. यावर सविस्तर चर्चेसाठी वेळ नेमून द्यावी, परिक्षा घोटाळ्याची सविस्तर चर्चा लावावी. न्यासाला 21 जानेवारी 2021 ल अपात्र ठरवलं त्यानंतर ते कोर्टात गेले त्यानंतर त्यांना ४ मार्च 2021 ला पुन्हा पात्र केलं. तसेच म्हाडा भरतीत घोटाळ्यानंतर जीए सॉफ्टवेअरनं TET परीक्षेत घोटाळा केला. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्यांसह झाली नाही.

माजी आमदारांकडे ध्वनीफीत आहे. एकेकापदासाठी काय बोली लागली त्याची माहिती आहे. ४ लाख 61 हजार अर्ज प्राप्त झाले. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी ऑडिओ क्लिप समोर आणली. क गटाच्या पदासाठी १५ लाख तर ड गटाच्या पदासाठी ८ लाखांची बोली लागली होती. केवळ अमरावतीत 200 जणांची बोगस नियुक्ती करण्यात आली. ७ दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटली याची तार मंत्रालयापर्यंत आहे, असा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.

फडणवीसांची सरकारला विचारले पाच प्रश्न

१) आधी चार कंपन्या फायनल केल्या होत्या, त्या डावलून न्यासालाच कंत्राट का दिलं?

२) परीक्षेसाठी तुम्हाला हीच कंपनी सापडली का?

३) एकतरी परीक्षा तुम्हाला घोटाळ्याशिवाय घेता येते का?

४) परीक्षा केंद्रांबद्दल इतका घोळ का?

५) सरकारसंबंधीत अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरकडे प्रश्नपत्रिका कशी काय मिळते?

टॅग्स :Maharashtra News