
'राजेंच्या मनात जनतेविषयी असलेली आत्मियता, आपुलकी त्यांच्या दौऱ्यात नेहमीच पहायला मिळाली.'
कोल्हापूर : माझी वाटचाल सदैव छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या विचारांवर चाललेली असल्यामुळं सर्वसामान्य जनतेशी अतूट नातं निर्माण झालंय. हा माझ्या वागण्यातील साधेपणा नसून, लहानपणापासून माझ्यावर झालेले संस्कार आहेत, असे स्पष्ट मत कोल्हापूरचे (Kolhapur) खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी व्यक्त केले.
'..म्हणून संभाजीराजे गोरगरीब जनतेला भावतात' या मथळ्याखाली संभाजीराजेंच्या साधेपणाबद्दल 'ई-सकाळ'नं रविवारी (ता. 9) बातमी प्रसिध्द केली होती, यावरती प्रतिक्रिया देताना खासदार संभाजीराजे यांनी स्वत:च्या फेसबुक पेजवरती पोस्ट शेअर करत 'ई-सकाळ'चे आभार मानलेत. वर्तमानपत्रे सुध्दा काळानुरूप बदलत आहेत. डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून जगभरातील बातम्या प्रसारित करण्याचं कार्य ते सातत्यानं करत असतात. महाराष्ट्रातील अग्रणी असलेलं वृत्तपत्र 'दैनिक सकाळ' हे ही याला अपवाद नाही, असं त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलंय आणि 'सकाळ' घेत असलेल्या भूमिकेचं कौतुक केलंय.
कोल्हापूरच्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा साधेपणा आपल्याला वेळोवेळी पहायला मिळतो. कधी शेतामधील औतावर बसून जेवण, कधी जामखेड (Jamkhed) येथील निवारा बालगृहातील मुलांसोबत जेवण, तर कधी स्टॉलवरती कोकम सरबतचा आस्वाद घेताना राजे पहायला मिळतात. मराठा आरक्षणासाठी स्वत: पुढाकार घेत संभाजीराजे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत, तर कधीत दिल्लीत आरक्षणासह अनेक समस्या सोडविताना दिसताहेत.
हे सगळं करत असताना राजेंच्या मनात जनतेविषयी असलेली आत्मियता, आपुलकी त्यांच्या दौऱ्यात नेहमीच पहायला मिळाली. राज्यभरातील दौऱ्यात संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) रस्त्यावर उतरले, तर कधी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले, हेच नव्हे तर असे बरेच विषय त्यांनी आपल्या कृतीतून हाताळले आहेत. म्हणूनच, तर संभाजीराजे गोरगरीब जनतेच्या मनात कायम घर करुन आहेत, हिच त्यांच्या कार्याची खरी पोहोच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.