नितीन गडकरींच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ! पोलिसांनी घेतलं ताब्यात - Nitin Gadkari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ! पोलिसांनी घेतलं ताब्यात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विविध विकास कामांचं लोकापर्ण त्यांच्या हस्ते झालं. याच कार्यक्रमात काही शेतकऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात दोन जणांनी गोंधळ घालण्यात प्रयत्न केला.

मात्र दोघांनाही पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. हिंगोलीत गडकरींच्या हस्ते दोन महामार्गाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी हा गोंधळ झाला. रामलीला मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असताना दोन शेतकरी उभे राहीले आणि त्यांनी घोषणा दिल्या. काही प्रश्न देखील ते यावेळी विचारत होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या शेतकऱ्यांकडे गेले. यावेळी कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी लगेच शेतकऱ्यांकडे धाव घेतली. पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून बाहेर नेले.

शेतकऱ्यांची तक्रार काय?

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात प्रशासनाने अन्याय केल्याची तक्रार या शेतकऱ्यांची होती. या दोघांनी निवेदन देण्याचे बोलून दाखवले. पण पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Nitin GadkariHingoli