भारत-बांगलादेश सामन्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या फौजदाराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

दुपारी 12 च्या सुमारास वरिष्ठ पोलिस अधिकारी हे शिपायांचा बंदोबस्त लावत होते. त्यावेळी मदार शेख हे स्टेडियमच्या जवळच असलेल्या पोलिस पेंडालमध्ये खुर्चीवर बसले होते.

नागपूर : जामठा येथे भारत आणि बांगलादेश दरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका सहायक फौजदाराचा मृत्यू झाला. मदार शेख असे मृत सहायक फौजदाराचे नाव असून ते शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत होते.

- महत्त्वाची बातमी. : भाजपने केली विरोधात बसायची तयारी?

भारत-बांगलादेश दरम्यान रविवारी (ता.10) जामठा येथे एकदिवसीय क्रिकेट सामना होता. या सामन्यासाठी शहर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे सकाळीच पोलिस शिपायांना जामठा येथे बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले होते. सहायक फौजदार मदार शेख हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह वाठोडा येथे बंदोबस्तासाठी गेले होते.

- के. एल. राहुलसोबतच्या नात्याबाबत अथिया म्हणते…

दुपारी 12 च्या सुमारास वरिष्ठ पोलिस अधिकारी हे शिपायांचा बंदोबस्त लावत होते. त्यावेळी मदार शेख हे स्टेडियमच्या जवळच असलेल्या पोलिस पेंडालमध्ये खुर्चीवर बसले होते. दुपारी 12.05 च्या सुमारास अचानक त्यांना चक्कर येऊन ते खाली पडले. लगेच त्यांना जामठा येथील शुअरटेक हॉस्पिटल येथे नेण्यात आले. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत असतानाच त्यांचा जीव गेला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

- पुणे : उसने पैसे मागितल्याने पतीला मारहाण; पत्नीचा विनयभंग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Policeman died at VCA Jamtha Cricket stadium Nagpur