पंकजा मुंडे भाजपला देणार सोडचिठ्ठी? रासपमध्ये करणार प्रवेश?

Possibility of Pankaja Munde will enter in RSP.jpg
Possibility of Pankaja Munde will enter in RSP.jpg

पुणे : भाजपच्या माजी आमदार व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या भाजप पक्ष सोडून रासपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. काल फेसबुक पोस्ट लिहून आधीच त्यांनी खळबळ निर्माण केली होती. त्यांनी ट्विटरवर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाचे नाव हटविल्याने पुन्हा भाजपला गोंधळात टाकले आहे. यामुळे नक्की काय होणार याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. तर मित्रपक्ष असलेले रासपचे महादेव जानकरही भाजपवर नाराज आहेत. 

मी परत येईन म्हणालो नव्हतो तरी आलो..!

विधानसभा निवडणूकीत बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा त्यांचे बंधू व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. पंकजा यांचा पराभव हा भाजपसाठी अत्यंत धक्कादायक होता. सत्तानाट्यात त्या फारशा सक्रिय दिसल्या नाहीत. यानंतर काल त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित सागंतिले की, "12 डिसेंबरला आपण भेटू, मला तोपर्यंत वेळ हवा आहे.'' त्यामुळे 12 डिसेंबरला त्या काय खुलासा करणार याची उत्सुकता असतानाच त्यांनी आता ट्विटर अकाऊंटवरून भाजपचे नाव हटविल्याने पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यात पकंजा मुंडे रासपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चेला सध्या उधाण आले आहे.

शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

रासपचे महादेव जानकर यांनी वेळोवेळी अमित पालवे हे रासपचे असल्याचा उल्लेख केला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी महादेव जानकर यांना मानसपुत्र मानले होते. त्यामुळे बहिण भावाच्या नात्याला मान देऊन पंकजा मुंडे व महादेव जानकर एकत्र येत राज्यात ओबीसी एक करण्याच्या तयारीत आहेत. यापुर्वी गोपीनाथ मुंडे यांनी माधव पॅटर्न राबविला होता. तोच पुन्हा 25 वर्षांनी राबविण्याच्या तयारीत असून मोठे शक्ती प्रदर्शन गोपीनाथगडावर होणार आहे.

रासपचे गंगाखेड मतदार संघाचे रत्नाकर गुठे सध्या जेलमधून आमदार आहे. त्यांनी पंकजा मुंडे परळीमधून पराभूत झाल्यानंतर रत्नाकर गुठे यांच्या गंगा खेड मतदार संघातून उमेदवारी करावी असा आग्रह कार्यकर्ते व नेत्यांनी धरला होता. त्यावरतीही पंकजा मुंडे यांनी कोणतीही भूमिका मांडली नाही. रत्नागुठे यांनी राजीनामा दिल्यास पंकजा मुंडे तेथून उभ्या राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता नाकरता येत नाही.  

 या पार्श्वभूमीवर नाराज पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार का? रासपमध्ये प्रवेश करणार का? याचा खुलासा 12 डिसेंबरलाच होईल. कारण 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांची जयंती असते, याच दिवशी पंकजा त्यांच्या पुढील निर्णयाबाबत बोलणार आहेत. आता पंकजा मुंडे काय निर्णय घेतील याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com