esakal | स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढा - दादाजी भुसे | Dadaji bhuse
sakal

बोलून बातमी शोधा

dadaji bhuse

स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढा - दादाजी भुसे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विमा कंपन्यांनी (Insurance company) पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती (natural calamities) अंतर्गत प्राप्त तक्रारी (complaints) तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे (dadaji bhuse) यांनी दिले. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणी पश्चात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक (ministry meeting) आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा: इमारतीतील छत कोसळून दोन जखमी; माटुंगा लेबर कॅम्पमधील घटना

या बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, संचालक, कृषि आयुक्तालय विकास पाटील, मुख्य सांख्यिकी कृषि आयुक्तालय विनयकुमार आवटे व संबंधित विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे.

हेही वाचा: प्रभादेवीतील पालिका शाळेत पहिली घंटा वाजली; विद्यार्थी सुखावले

संबंधित कंपन्यांना पंचनामे करण्याची गती वाढविण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात यावी. पंचनामे करणाऱ्यांचे मनुष्यबळ वाढविण्यात यावे असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी दिले. सोयाबीन पीक काढण्याच्या अवस्थेत असल्यामुळे पंचनामे करण्याच्या वेळी पीक उपलब्ध नाही, या कारणामुळे विमा दावे अपात्र ठरवू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुलढाणा जिल्ह्याची नुकसान भरपाई अदा करा

पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० मधील बुलढाणा जिल्ह्याची प्रलंबित नुकसान भरपाई रुपये ६४ कोटी ५९ लाख ही रक्कम पात्र शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यात यावी, असे निर्देशही कृषिमंत्री भुसे यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले. त्यावर येत्या ८ दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.

loading image
go to top