'...तर बाबासाहेबांच्या स्मारकाचा निधी 'वाडिया'साठी द्या' : अॅड. आंबेडकर

Prakash-Ambedkar
Prakash-Ambedkar

पुणे : इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यात येत आहे. मात्र, हायकोर्टाने राज्य सरकारला पुतळ्यासाठी पैसे आहेत. मग इतर कामासाठी नाहीत का? असे विचारले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देण्यात यावा आणि तसा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या निषेधार्थ वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता.24) 'महाराष्ट्र बंद' आंदोलन करण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी शनिवारी (ता.१८) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. या महाराष्ट्र बंदमध्ये सर्व समाज घटकांनी सहभागी व्हावे आणि हा बंद शांततेत पाळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सद्यस्थितीत देशातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे़. आराजक माजेल अशी स्थिती निर्माण झाली असून, याला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. केंद्रीय सरकार देशात  दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहे. त्यातूनच सीएए, एनआरसी आणि एनपीआरसारखे  कायदे आणि नियम जाणिवपूर्वक लागू केले जात आहेत, अशी  टिकाही   त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर केली.        

आंबेडकर म्हणाले, "केंद्रातील भाजपचे सरकार हे आरएसएसचे  आहे. ते ज्या पध्दतीने सरकार चालवतात त्यात कुठेही लोकशाहीचा अंश दिसत नाही. सरकार भितीचे वातावरण करीत आहे. आमची लढाई ही संविधानिक आहे. देशात विषमतावादी व्यवस्था आणण्याचा सरकारचा डाव आहे़. आरएसएसला गेल्या ७० वर्षात त्यांचा उद्धेश साध्य करता आला नाही. त्यांचा तो उद्देश आता हे सरकार साध्य करायला निघाले आहे़. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे़."

भाजपाला सरकार चालविण्यासाठी पुरेसा निधी नाही़. अर्थव्यव्यवस्थेत १३ लाख कोटींची तुट असून ही तुट
कशी भरून काढणार? असा प्रश्नही आंबेडकर यांनी उपस्थित केला़ आहे. एनआरसी, सीएए व एनपीआर या कायद्याबाबत बोलताना ते म्हणाले, "हे कायदे लागू झालेल्या आसाममध्ये सर्वाधिक हिंदू नागरिक बेकायदा रहिवाशी असल्याचे उघड झाले आहे.

हे कायदे केवळ मुस्लिमांच्याच नव्हे, तर हिंदुच्या विरोधातीलसुद्धा आहेत. हे लोकांसमोर यावे, यासाठी आमची लढाई सुरू आहे़. देशाची अर्थव्यवस्था ठप्प आहे़. त्यामुळे सरकार भारत पेट्रोलियमसारखी कंपनी विकायला निघाले आहे. केंद्रातील सरकार दारुड्यासारखे वागत आहे. भारत पेट्रोलीयम ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. अन् तिच आता विकायला काढली आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com