
प्रविण दरेकरांवर आरोप करणे भोवणार? पटोलेंसह भाई जगताप यांना नोटीस
मुंबई : मुंबई बँकेत (Mumbai Bank Scam) दोन हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते भाई जगताप आणि नाना पटोले यांनी केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दरेकरांचा घोटाळा पाठिशी घातल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्याविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्याकडून मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी आम आदमी आक्रमक
नाना पटोले आणि भाई जगताप यांनी मुंबई बँकप्रकरणी आरोप केल्यानंतर आपण दोन्ही नेत्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला होता. त्यानुसार आज प्रवीण दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी नाना पटोले आणि भाई जगताप यांना मानहानीची नोटीस बजावली आहे.
प्रविण दरेकरांवर आरोप काय? -
प्रविण दरेकर यांनी २०१३-१४ आणि २०१९ ते २०२० मध्ये मुंबई बँकेत घोटाळा केला असून दोन हजार कोटींचा हा घोटाळा आहे. पोलिसांनी प्रविण दरेकर यांना तत्काळ अटक करावी. तसेच प्रविण दरेकर यांचा घोटाळा पाठिशी घालणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील तसेच संबंधित व्यक्तींविरोधात देखील कारवाई करावी, अशी मागणी भाई जगताप यांनी केली होती.
प्रविण दरेकर मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी अडचणीत सापडले होते. त्यांनी मजूर नसताना मजूर निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रविण दरेकर यांनी बँकेवर सत्ता असताना काही लाभ घेतल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून दरेकरांची चौकशी सुरू आहे.
Web Title: Pravin Darekar Filed Defamation Against Nana Patole And Bhai Jagtap Over Mumbai Bank Scam Allegations
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..