Pre Monsoon Rain Maharashtra : पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण, हवेचा कमी दाबाचा पट्टा आणखी सक्रिय; महाराष्ट्रात पावसाळ्यासारखा पाऊस होणार

monsoon like rain in Maharashtra : हवेचा कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
Maharashtra heavy rain forecast

Maharashtra heavy rain forecast

esakal

Updated on

Maharashtra heavy rain forecast : राज्यात उष्णतेचा तडाखा कायम असतानाच आता पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा आणि कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com