Congress : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस सोडणार? पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan press conference in Karad

'काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी ऑगस्ट 2020 मध्ये आम्ही केली होती.'

Congress : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस सोडणार? पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

कराड (सातारा) : काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीनं चाललेला नाही, मागील 24 वर्षे संघटनात्मक निवडणुका झालेल्या नाहीत यासह विविध मुद्यांवर पक्षाच्या ध्येय धोरणांवर सडकून टीका करणारे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी कराडात पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली.

'काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा'

मी काँग्रेस (Congress) सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे मला माहित नाही. पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे. आम्हाला भिती आहे की लोकशाही धोक्यात आहे, असं ते म्हणाले आहेत. काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी ऑगस्ट 2020 मध्ये आम्ही केली होती. ती मागणी सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) मान्य केली. त्याबद्दल त्यांचं जाहीर आभार मानत पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

हेही वाचा: Vedanta-Foxconn प्रकल्प गुजरातनं पळवलाय; अंबादास दानवेंचा आरोप

'महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा दुर्दैवी निर्णय आहे'

ते पुढं म्हणाले, 'काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होत आहे. कोरोनामुळं अध्यक्षांचा थेट संवाद होत नव्हता. त्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली नाही. यामुळं अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. ते गोपनीय होतं. ते पत्र फोडलं. काँग्रेसचा अध्यक्ष थेट नेमणुकीमुळं होऊ नये. त्यासाठी निवडणूक व्हावी, अशी आमची मागणी होती. ती आता मान्य झाली आहे.' गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्यावर बोलताना चव्हाणांनी गोव्यात दुर्दैवी घडलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेण्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा दुर्दैवी निर्णय आहे, असं ते म्हणाले.

हेही वाचा: नितीशकुमारांनी 'ही' अट मान्य केल्यास, त्यांना पाठिंबा देणार; प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

Web Title: Prithviraj Chavan Press Conference In Karad Regarding Congress Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..