खासगी नोकरदार सर्वाधिक तणावात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

‘सकाळ सोबत बोलूया’ या हेल्पलाइनवर गेल्या चार महिन्यांत राज्यभरातून सुमारे पाच हजारांहून अधिक लोकांनी विविध मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी मुक्त संवाद साधला. गेल्या चार महिन्यांपासून तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांची पंधरा जणांची टीम हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत, त्यांचे चोवीस तास मोफत योग्य समुपदेशन व मार्गदर्शन करत आहे.

राज्यातील पाच हजार जणांनी हेल्पलाईनवर साधला मुक्त संवाद
पुणे - ‘सकाळ सोबत बोलूया’ या हेल्पलाइनवर गेल्या चार महिन्यांत राज्यभरातून सुमारे पाच हजारांहून अधिक लोकांनी विविध मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी मुक्त संवाद साधला. गेल्या चार महिन्यांपासून तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांची पंधरा जणांची टीम हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत, त्यांचे चोवीस तास मोफत योग्य समुपदेशन व मार्गदर्शन करत आहे. लॉकडाउनच्या काळात घरांमध्ये, कुटुंबांमध्ये विविध कारणांनी ताण - तणाव होता. या हेल्पलाइनमुळे लोकांना व्यक्त होण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ‘सकाळ सोबत बोलूया’ ही हेल्पलाइन मानसिक ताण- तणाव व समस्येचा सामना करणाऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने we are in this togetherया मोहिमेअंतर्गत व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने आणि कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअँबीलीटीजच्या सहकार्याने मानसिक ताण- तणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया‘ ही चोवीस तास मोफत हेल्पलाइन तीन ऑगस्टला सुरू करण्यात आली. त्याला आज चार महिने पूर्ण झाले.

Corona Updates: विमानाने पुण्यात आलेले 21 प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

राज्यभरातून हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक ४५. ३ टक्के लोक पुणे जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल ६ टक्के लोक नगर जिल्ह्यातील आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचे प्रमाण अनुक्रमे ५ टक्के आहे. तसेच जिल्हानिहाय लोकांचे प्रमाण कमी - अधिक आहे. तसेच ५८. ६ टक्के लोकांना एकाहून अधिक वेळा समुपदेशनाची गरज आहे, असे निदर्शनास आले.

पुण्यात हवाला व्यवहारावर मोठी कारवाई; कोट्यवधी रूपयांची रोकड जप्त

हेल्पलाइनवर मदतीसाठी फोन करणाऱ्या पाच हजाराहून अधिक लोकांमध्ये खासगी नोकरदार वर्गाचे प्रमाण पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल गृहिणींचे प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच व्यावसायिक, विद्यार्थी, बेरोजगार व्यक्ती व शेतकरी या वर्गांचे मदतीसाठी फोन करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. येणाऱ्या कॉल्सच्या समस्यांमध्ये चिंता, काळजी, भीती आणि मानसिक विकार, नातेसंबंध व बेकारी यामुळे येणारा मानसिक ताण- तणाव संबंधित प्रश्नांचा प्रामुख्याने समावेश होता. नैराश्‍यातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी ही हेल्पलाइन सुरू केली आहे. पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.

व्वा, क्या बात है! वयाच्या ७२ व्या वर्षी स्वाभिमानाने जगणारे बासरीवाले आजोबा; एकदा व्हिडिओ बघाच

ऑनलाइन बुकींगला मोठा प्रतिसाद
काही लोकांना सातत्याने समुपदेशनाची आवश्‍यकता असते तर काही लोकांना प्रत्यक्ष भेटून समुपदेशन करण्याची आवश्‍यकता असते. ही गरज लक्षात घेऊन सर्व वयोगटातील नागरिकांसाठी नाममात्र सशुल्क दरात तज्ज्ञ समुपदेशकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी we are in this together या वेबसाईटद्वारे ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा मागील दोन महिन्यांपासून सुरू केली आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. we are in this together या वेबसाईटद्वारे आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार व आपल्या समस्येनुसार तज्ज्ञ समुपदेशकांची अपॉइंटमेंट नागरिकांना बुक करता येईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private employees under the most stress