esakal | तुम्हाला 'व्हिंटेज' वाहन जतन करायचे आहे का? ही बातमी जरूर वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

vintage car

तुम्हाला 'व्हिंटेज' वाहन जतन करायचे आहे का? बातमी जरूर वाचा

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : जुन्या, नामशेष झालेल्या मॉडेल वाहनांचे (Vintage vehicles) जतन करण्यासाठी त्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया निश्‍चित करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने सीएमव्हीआर (CMVR) १९८९ मध्ये त्यासाठी दुरुस्ती केली आहे. अशा वाहनांचा जुना क्रमांक नव्या नोंदणीत कायम ठेवता येणार आहे. सविस्तर माहिती वाचा>>>

(The process of registration of Vintage vehicles marathi news)

अशी असेल नोंदणी प्रक्रीया...

नव्याने नोंदणीसाठी व्हीए (VA) अशी नवी मालिका दिली जाईल. ज्या वाहनांची आधीच नोंदणी झाली, त्यांना आपले आधीची नोंदणी चिन्हे कायम ठेवता येतील. मात्र, नव्याने नोंदणी करण्यासाठी नोंदणी एक्सएक्स (XX), व्हीए (VA), वायवाय (YY) अशा प्रकारे केली जाणार आहे. त्यात व्हीएचा अर्थ व्हिंटेज असा आहे. एक्सएक्सच्या स्थानी राज्याचा कोड असेल. वायवायच्या स्थानी दोन अंकी मालिका आणि हा क्रमांक ०००१ ते ९९९९ यापैकी राज्य प्राधिकरणाकडून मिळालेला क्रमांक असेल. नव्या नोंदणीसाठी २० हजार रुपये आणि पुनर्नोंदणीसाठी पाच हजार रुपये शुल्क असणार आहे.

हेही वाचा: पोलिस आयुक्तांच्या मदतीने 'बाबांना' मिळाली मायेची सावली!

'या' वाहनांनाच व्हिंटेज म्हणता येईल

‘व्हिंटेज’ वाहनांची नोंदणी करण्यासाठी कोणत्याच राज्यात निश्‍चित नियम अथवा नोंदणीची प्रकिया अस्तित्वात नाही. अशावेळी नवे नियम, एक सुलभ प्रक्रिया उपलब्ध करतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी हे स्पष्ट केले आहे. सर्व दुचाकी-चारचाकी वाहने जी ५० पेक्षा अधिक वर्षे जुनी असतील आणि ती त्यांच्या मूळ रूपात सांभाळली गेली असतील, ज्यांच्यात कोणतीही मोठी दुरुस्ती करण्यात आली नसेल, अशा सर्व वाहनांना ‘व्हिंटेज’ मोटार वाहन म्हटले जाईल.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय

'ही' कागदपत्रे असतील आवश्यक

नोंदणी-पुनर्नोंदणीसाठीचे अर्ज २०२० नुसार करता येतील. त्यासोबत विमा पॉलिसी, शुल्क, वाहन परदेशी असल्यास, आणल्याची शुल्क पावती आणि आधी नोंदणी झालेल्या वाहनांचे जुने नोंदणी प्रमाणपत्र जोडावे लागेल. राज्य नोंदणी प्राधिकरण अर्ज क्रमांक २३ ए नुसार ६० दिवसांच्या आत नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल. मात्र ‘व्हिंटेज’ मोटार वाहने नियमित अथवा व्यावसायिक स्वरूपात रस्त्यांवर चालवता येणार नाहीत.

(The process of registration of Vintage vehicles marathi news)

हेही वाचा: मित्रांमुळे मुलांना वाईट संगत लागलीये? अशा पद्धतीने करा सुटका

loading image