

Maharashtra Weather Update Pune Faces Rain Alert for Next Few Hours
Esakal
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अचानक पावसाने हजेरी लावल्यानं मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस झालाय. आता हवामान विभागाकडून येत्या चार ते पाच दिवसात बहुतांश भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD Predicts Rain in Pune