
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आता पुन्हा एका वक्तव्यानं अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अभिनेते सोलापूरकर यांनी आथा एका मुलाखतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचं म्हटलंय. त्यांचं मुलाखतीतलं हे विधान आता सोशल मीडियावर व्हायरल झालं असून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राहुल सोलापूरकर यांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.