राज ठाकरे दोन दिवस पुण्यात; २९, ३० एप्रिलला दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे २९, ३० एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत.
Raj thackeray
Raj thackeraySakal

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे २९, ३० एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यातून ते रवाना होणार आहेत. मनसेच्या पुणे (Pune) शहर कोअर कमिटीची बैठक आज मंगळवारी (ता.२६) पार पडली. या बैठकीत औरंगाबाद सभेच्या नियोजनावर चर्चा झाली. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्यावरही बैठकीत चर्चा झाली आहे. येत्या ३ मे रोजी होणाऱ्या महाआरती संदर्भात देखील नियोजन पूर्ण झालेले आहे. (Raj Thackeray Visit Pune On 29, 30th April)

Raj thackeray
अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे, चांदीवाल अहवालात स्पष्ट

महाआरतीसाठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस ठाण्यामध्ये पत्र देण्याचे काम सुरु आहे. मनसे शहर कार्यालयात सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद येथील सभा येत्या १ मे रोजी होणार आहे. त्याची राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मनसे सभा घेण्यावर ठाम आहे. दुसरीकडे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर औरंगाबादमध्ये जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

Raj thackeray
सदावर्तेंना HC चा दिलासा; पुण्यातील तक्रारीसाठी अटकपूर्व जामीन

सभेचे टिझर मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी नागरिकांना सभेसाठी निमंत्रण देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com