गृहपाठ न केल्यामुळे पडळकर, खोत तोंडघशी पडले; राजू शेट्टी

Raju Shetti
Raju Shettisakal

गेले सोळा दिवस चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागले आहे. राज्य सरकारने एसटी संपावर (ST Strike) तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)त्यांनी या संपातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. यावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर खरमरीत टिका केली आहे.

Summary

''शेतकरी चळवळ आणि कामगारांची चळवळ वेगळी असते. एसटीचे आंदोलन आणि शेतकऱ्यांचे आंदोलन वेगळे असते.

Raju Shetti
कोल्हापूर - सतेज पाटील बिनविरोध; महाडिकांची माघार

ते म्हणाले,''शेतकरी चळवळ आणि कामगारांची चळवळ वेगळी असते. एसटीचे आंदोलन आणि शेतकऱ्यांचे आंदोलन वेगळे असते, याचा गृहपाठ न केल्यामुळे पडळकर आणि खोत यांना तोंडघशी पडावे लागले,अशी खोचक टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष (Raju Shetty) राजू शेट्टी.

“आपण ज्यांचे नेतृत्त्व केले त्यांच्या अपेक्षा भरपूर वाढून ठेवल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. मग शेवटी चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघच आहे. वाघावर स्वार होणे सोपे असते. पण, एकदा स्वार होऊन परत पायउतार होणे अवघड असते. अन्यथा वाघ चिडला, तर मग वाघाने ज्याला आपल्यावर स्वार केलेले असते. त्याला तो खाऊ टाकायलाही मागेपुढे बघत नाही,”असे सांगत राजू शेट्टी यांनी पडळकर आणि खोतांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान अनिल परब म्हणाले, अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं आहे. मात्र कर्मचारी विलगीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवला तर एक दिवसाला 8 दिवसांची पगारकपात केली जाईल. कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान करायचे नाहीय. जे कर्मचारी कामावर येतील त्यांना संरक्षण दिलं जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com