'शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे'

'शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे'

दुबई: शिवसेनेने अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार न करता भाजपसोबतच सरकार स्थापन करावे, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (गुरुवार) केले. तसेच भाजप-शिवसेनेच्या दिलजमाईसाठी प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी भाजपसह शिवसेना आग्रही आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता यावर रामदास आठवले यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, शिवसेनेने अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार न करता भाजप या आपल्या जुन्या मित्रासोबत एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे. भाजपनेही दोन पाऊले मागे जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसोबत तडजोड करून सत्ता स्थापन करावी. 30 वर्षे जुन्या युतीच्या भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांना एकत्र आणून त्यांच्यात दिलजमाई करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 

मुंबईत आल्यानंतर भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. 

सरकार स्थापनेची योग्य दिशा भाजप

उद्धव ठाकरे यांची काँग्रेससोबत योग्य दिशेने चर्चा सुरु आहे, असे म्हटले असले तरी त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत युती करण्याची दिशा चुकीची आहे. त्यांनी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा करण्याची योग्य दिशा भाजप आहे.

कार्यकर्त्यांना सत्ता देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेमध्ये दिलजमाई करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असेही आठवले म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com