Ramdas Kadam on Ladki Bhain Scheme Closure : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजनेचा निधी १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र, अर्थसंकल्पात सरकारने यासंदर्भातील कोणतीही घोषणा केलेली नाहीये. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे.