Vidhan Sabha 2019 :..म्हणून इतर पक्षातील लोक करताहेत भाजपप्रवेश : दानवे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

- राज्यातील विविध पक्षातील नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

- त्यावर रावसाहेब दानवे यांनी केले वक्तव्य.

वडगाव मावळ : "राज्य सहकारी बँक कर्जवाटप घोटाळा हा युतीच्या नव्हे, तर कॉंग्रेस सरकारच्या काळातच उघड झाला होता व कारवाईची प्रक्रियाही तेव्हाच सुरू झाली होती. त्यामुळे राज्य सरकार आकसाने कारवाई करीत असल्याचा आरोप निराधार आहे,'' असे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. तसेच भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष असून, यावर विश्‍वास ठेवून लोक पक्षात येत आहेत, असेही ते म्हणाले.

मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी विजय संकल्प बूथ मेळावा झाला. त्या वेळी दानवे बोलत होते. कामगार व पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अविनाश बवरे, रामनाथ वारिंगे, भास्करराव म्हाळसकर, सुवर्णा कुंभार, सुरेखा जाधव, चित्रा जगनाडे, गुलाबराव म्हाळसकर, सुनील शेळके, रवींद्र भेगडे उपस्थित होते. 

राज्यात महायुतीचेच सरकार येणार

दानवे म्हणाले, "भाजपमध्ये सुरू असलेल्या मेगाभरतीबाबत धाक दाखवून पक्षांतर घडवून आणले जात असल्याची टीका विरोधक करीत आहेत; परंतु भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. पक्षाला खंबीर नेतृत्व मिळाले असून, यावर विश्‍वास ठेवून लोक पक्षात येत आहेत. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना सांभाळून घ्यावे.'' 

मोदी म्हणजे फादर ऑफ इंडिया : डोनाल्ड ट्रम्प

राज्यमंत्री भेगडे म्हणाले, "मंत्रिपदाच्या गेल्या तीन महिन्यांच्या काळात अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले आहेत. मावळ तालुका राज्यात नंबर एकचा तालुका करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.''

Viral Satya : अमृता फडणवीस यांचा फेक व्हीडीओ वायरल (व्हिडिओ)

या मेळाव्यात कामगार नेते ऍड. विजय पाळेकर, देवा गायकवाड, स्वामी गायकवाड, अरुण शिंदे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत ढोरे यांनी प्रास्ताविक केले. संदीप काकडे यांनी स्वागत केले. बाबूलाल गराडे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब घोटकुले यांनी आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raosaheb Danve talked about other party leader enter in BJP