लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात: रश्मी ठाकरे

लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, असं रश्मी ठाकरे म्हणाल्या.
Lata Mangeshkar Rashmi Thackeray
Lata Mangeshkar Rashmi ThackerayEsakal

गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झाले. त्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Tackeray) यांनी लतादीदींनी श्रद्धांजली वाहिली. लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दीदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठाआघात झाला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Rashmi Thackeray pays homage to Empress Lata Mangeshkar)

Lata Mangeshkar Rashmi Thackeray
Lata Mangeshkar: लतादीदींचं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाणं ऐकून नेहरूंचे अश्रू अनावर; वाचा किस्सा

बाळासाहेब (Balasaheb Thackeray) असताना आणि नंतर देखील लतादीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दीदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात रश्मी ठाकरे यांनी आपले दुःख व्यक्त केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com