esakal | रयत शिक्षण संस्थेच्या निवडी बिनविराेध; अखेर काेण झाले सचिव वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

रयत शिक्षण संस्थेच्या निवडी बिनविराेध; अखेर काेण झाले सचिव वाचा सविस्तर

रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षांसाठी निवड करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संस्थेच्या जनरल बॉडीची सभा झाली.

रयत शिक्षण संस्थेच्या निवडी बिनविराेध; अखेर काेण झाले सचिव वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली. सचिवपदी नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांची निवड करण्यात आली.
मराठा जात प्रमाणपत्र असे काढा
 
दरम्यान, उच्च शिक्षण सहसचिवपदी येथील धनंजयराव गाडगीळ वाणीज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांची, तसेच माध्यमिक शिक्षण सहसचिवपदी नगर येथील संजय नागपुरे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, जयश्री चौगुले, अरुण कडू-पाटील, पी. जे. पाटील, आमदार चेतन तुपे यांची निवड करण्यात आली आहे. मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांचीही निवड करण्यात आली.
 
रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षांसाठी निवड करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संस्थेच्या जनरल बॉडीची आज (शनिवार) सभा झाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर तीन वर्षांनी केली जाते. या निवडी आजवर कर्मवीर पुण्यतिथी दिवशी म्हणजेच नऊ मे रोजी केल्या जात. यंदा कोरोनामुळे या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आज सुरक्षित अंतराचे नियम पाळून जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्यासह सर्व जनरल बॉडीचे सदस्य उपस्थित होते. सचिवपदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र, बैठकीत प्राचार्य डॉ. शिवणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

आज निवडलेले मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य पुढीलप्रमाणे : डॉ. अनिल पाटील, ऍड. भगीरथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, रामशेठ ठाकूर, ऍड. रवींद्र पवार, मीनाताई जगधने, डॉ. विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, दादाभाऊ कळमकर, बाबासाहेब भोस, मुमताजअली शेख, डॉ. यशवंत थोरात, रामचंद्र गायकवाड, कृष्णराव घाटगे, डॉ. भारत जाधव, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, चंद्रकांत वाव्हळ, डॉ. भाऊसाहेब कराळे, विलास महाडिक, प्रिं. डॉ. गणेश ठाकूर, ऍन्थोनी ऍलेक्‍स डिसोझा, तुकाराम कन्हेरकर, प्रा. डॉ. काळुराम कानडे.

रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदासाठी ही नावे हाेती चर्चेत

रयत संस्थेत कामाला लावतो सांगून उकळले लाखो रुपये

प्रशासनाच्या कासव गतीने वाढविली 30 हजार युवकांची चिंता